लोहारा / उमरगा : आमदार ज्ञानराज चौगुले यांचे दि.29/10/2024 रोजी उमेदवारी अर्ज मोठ्या शक्ती प्रदर्शनाने दाखल करण्यात येणार आहे.
शक्ती प्रदर्शनाला सकाळी 09.00 वाजता महादेव मंदिर उमरगा येथून सुरुवात करुन छत्रपती शिवाजी चौक, बाळासाहेब ठाकरे चौक, अण्णाभाऊ साठे चौक ते तहसील कार्यालय पर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे.
त्यानंतर दुपारी 03 वाजता आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारार्थ छत्रपती शिवाजी चौक उमरगा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
पदयात्रा व जाहीर सभेसंदर्भात दि.27/10/2024 रोजी लोहारा तालुका शिवसेनेची आढावा बैठक युवासेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड व जिल्हाप्रमुख मोहन पणूरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
बैठकीत किरण गायकवाड यांनी शिवसेना, युवासेना, शेतकरी सेना, महिला आघाडी, युवती सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करत पदयात्रा व जाहीर सभेसंबंधी मार्गदर्शन केले.
या बैठकीस तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, प्रताप लोभे, माजी नगरसेवक अभिमान खराडे, नगरसेवक अमीन सुंबेकर, अविनाश माळी, श्रीकांत भरारे, अरिफ खानापुरे, गौस मोमीन, विजय ढगे, अमोल पाटील माजी पंचायत समिती सदस्य इंद्रजीत लोमटे व चनबस कारभारी, युवा सेना तालुकाप्रमुख दत्ता मोरे, जेवळी दक्षिण सरपंच शिवराज चिनगुंडे, सुरेश दंडगुले, परमेश्वर साळुंखे, अमोल सोमवंशी, अनंत बायस, सुरेश खंडाळकर, गहिनीनाथ सुरवसे, जितेंद्र कदम, सहदेव गोरे, नारायण क्षिरसागर, अनिल ओवांडकर, सद्दाम बागवान, हमीद पठाण व विभाग प्रमुख गणप्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.