लोहारा शहरात सोमवारी शिवसेना ठाकरे गटाची बैठक

लोहारा : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमरगा लोहारा मतदार संघाचे पक्ष निरीक्षक आनंत पाताडे यांची सोमवारी ७ ऑगस्ट रोजी लोहारा शहरात बैठक होणार आहे.
उमरगा-लोहारा विधानसभा मतदार संघाचे पक्ष निरीक्षक आनंत पाताडे यांची सोमवारी ७ ऑगस्ट रोजी ठीक सकाळी १०:३० वाजता लोहारा शहरातील स्वरांजली मोटर्स अमोल बिराजदार यांचे शोरुम येथे बैठक होणार असून लोहारा शहरासह तालुक्यातील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सर्व शिवसैनिक,युवासैनिक, पदाधिकारी, शाखा प्रमुख,बूथ प्रमुख यांनी उपस्थित रहावे असे अवाहन जिल्हा संघटक दिपक जवळगे, लोहीरा तालुकाप्रमुख अमोल बिराजदार,युवासेना उपजिल्हाप्रमुख नामदेव लोभे, लोहारा शहरप्रमुख सलिम शेख यांनी केले आहे.