जिल्हा परीषद केंद्रीय शाळेतील मुलीचा संघ खो-खोमध्ये तर मुलांचा संघ कबड्डीमध्ये तालुक्यात प्रथम

लोहारा : लोहारा शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील मुलांचा संघ कबड्डी या खेळात तालुक्यात प्रथम आला. तर खो-खो या स्पर्धेमध्ये मुलींचा संघ तालुक्यात प्रथम आला. तसेच कुस्तीमध्ये दिक्षा कार्ले, सुकेशनी माटे या दोन मुलींची जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली. वैयक्तिक योगासना स्पर्धेमध्ये अनिकेत क्षीरसागर या मुलाची जिल्हास्तरीय निवड झाली यासाठी शाळेतील शिक्षक सुरेश साळूंके,बालाजी यादव ,अतुल भड, प्रवीण शिंदे, अमोल जट्टे यांनी स्पर्धेची तयारी करून घेतली. जि.प.के.प्रा. शाळेचे मुख्याध्यापक मधुकर रोडगे यांनी मार्गदर्शन केले.