लोहारा नगरपंचायतच्या कर वसुलीची 36 प्रकरणे निकाली ; 3 लाख 38 हजार 866 रुपये वसुल

लोहारा : तालुका विधी सेवा समिती लोहारा व विधिज्ञ मंडळ लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालय क. स्तर लोहारा येथे दि. 11 फेब्रुवारी 2023 रोजी मा. श्रीमती एन.एस.सराफ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच एस. एस. कळसकर साहेब सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर लोहारा उपस्थित होते.
सदर लोकअदालत मध्ये दिवाणी प्रकरणे – 34, फौजदारी प्रकरणे – 58 निकाली काढण्यात आली. वादपूर्व प्रकरणामध्ये ग्रामपंचायत कर वसुलीमध्ये 54,14,768 रुपये, भारतीय स्टेट बँक लोहारा – 9 प्रकरणे निकाली निघाली त्यामध्ये 16,15,900/- रक्कम वसुल झाली, महाराष्ट्र ग्रामीण बँक – 03 प्रकरणे निकाली निघाली त्यामध्ये 109214/- वसुल झाले, नगर पंचायत लोहारा यांची कर वसुलीची 36 प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली त्यामध्ये 338866/- रुपये वसुल झाले, महावितरण लोहारा यांची 01 प्रकारणे तडजोडीने निकाली काढण्यात आली त्यामध्ये 4810/- रक्कम वसुल झाली. अशी एकूण 7483558/- रक्कम वसूल करण्यात आली. फौजदारी प्रकरनामध्ये 138900 /- दंड वसुल झाला. या राष्ट्रीय लोअदालत मध्ये श्री एम यु जट्टे वकील अध्यक्ष लोहारा विधीज्ञ मंडळ लोहारा, श्री दादासाहेब पाटील विधीज्ञ,, श्री एस. एन. भादुले ,विधीज्ञ, श्री एम. व्ही. साठे विधीज्ञ, श्री एस. जी. पनूरे ,विधीज्ञ, श्री एम. एस. वचणे ,विधीज्ञ, श्री एस. एस. कुलकर्णी ,विधीज्ञ, श्री टी एस. मोरे विधीज्ञ, श्री एस. आर. अडसूळे विधीज्ञ, इतर सर्व विधीज्ञ हजर होते. सर्व कर्मचारी उपस्थित होते, तसेच पक्षकार मोठया संख्येने हजर होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!