तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष के. टी. सोमवंशी यांचे निधन

लोहारा : लोहारा तालुक्यातील अचलेर येथील तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष , माजी तलाठी किसनराव तुकाराम सोमवंशी (वय 82 ) यांचे सोमवारी 9 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी 8 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पाश्चात पत्नी, एक मुलगा , पाच मुली ,सुना, नातवंडे , भाऊ असा परिवार आहे.