श्री बसवेश्वर विद्यालयात नारीशक्ती सन्मान दिन साजरा

जेवळी, (ता.लोहारा) : दजेवळी (ता.लोहारा) येथील श्री बसवेश्वर विद्यालयात नारीशक्ती सन्मान दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेतील सर्व शिक्षिकांचा सत्कार करून गौरविण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेवळी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव भुसणे तर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संघटक धनराज बिराजदार जिजाऊ ब्रिगेडच्या माजी तालुकाध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या रंजना हसुरे, माजी तालुका कार्याध्यक्षा प्रतिभाताई परसे, या शिक्षण संस्थेचे सचिव ॲड. प्रदीप पणुरे, खजिनदार गुरूलिंगप्पा कानडे, प्राचार्य दयानंद कापसे, मुख्याध्यापक यादव कांबळे यांची प्रमुख उपस्थित होती. यावेळी संस्थेच्या वतीने शिक्षिका शुभांगी हेबळे, वंदना केंद्रे, सुषमा बिराजदार, मुक्ताबाई डोईफोडे, चित्रा चटगे, जयश्री बनकर, शीला जाधव आदींचा यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेचे संचालक गौरीशंकर पणुरे, पर्यवेक्षक एम. सी. चौधरी, एम. वाया भोसले, पंडित कार्ले, पी. जी कारभारी, एस बी कोरे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक आर. व्ही. पाटील यांनी केले तर एस. एस. कारभारी यांनी सूत्रसंचालन केले. बी. ए. म्हेत्रे यांनी आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!