बेटी बचाव बेटी पढ़ाओच्या जय घोषात विद्यामाता इंग्लिश स्कुलची जनजागृती रॅली

लोहारा : बेटी बचाव बेटी पढ़ाओच्या जय घोषात विद्यामाता इंग्लिश स्कुलची जनजागृती रॅली लोहारा तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कुलने धानुरी व खेड येथे मंगळवारी काढण्यात आली आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बेटी बचाव बेटी पढाओ असा संदेश देऊन मुलीना शिक्षणापासुन वंचित ठेवले जाऊ नेय या उद्देशाने ही जनजागृती रॅली काढण्यात आली.
रॅली सुरवात सकाळी धानुरी येथे कढाण्यात आली. तर दुपारी खेड येथे काढण्यात आली आहे. या रॅलीमध्ये विद्यामाता इंग्लिश स्कुलच्या मुख्याध्यापिका हिरा सोलापुर, गिता चिकुद्रे,फुराना शेख,सोनाली अलमूले, अस्मिता म्हमाणे,ज्योति साठे,वैशाली कारभारीसुनिता सलगरकर,लता भोसले,मनिषा तेलकर, आशा कबिले, जन्नत कारभारी, शिवमाला हुडगे, सुवर्णा शिंदे,विद्या फुलसुंदर यांच्यासह पालक,विद्यार्थी मोठ्यासंख्येने सहभागी झाले होेते.

HTML img Tag Simply Easy Learning

याप्रसंगी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ओम सुर्यवंशी यांनी केले तर आभार सुनिल कांबळे यांनी मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!