लोहारा शहरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

लोहारा/प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले जयंती उत्सव समिती व सावित्रीबाई सखी मंच लोहारा यांच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती लोहारा शहरातील शिवनगर येथील माळी कॉम्प्लेक्स येथे दि.३ जानेवारी २०२४ रोजी साजरी करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्षा सौ.वैशालीताई अभिमान खराडे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका शामल माळी होत्या. यावेळी प्रा. डि.एन.कोटरगे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, मा.गटनेते अभिमान खराडे, गटनेत्या सौ.सारिका प्रमोद बंगले, मा. जि.प.सदस्या मिराताई माळी, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, राजेंद्र माळी, मा.सरपंच मुक्ताताई भोजणे, नगरसेविका सौ.सुमन दिपक रोडगे, नगरसेविका शमाबी शेख, शिवसेना उपतालुका प्रमुख परमेश्वर साळुंके, शिवसेना तालुका प्रमुख (ठाकरे गट) अमोल बिराजदार, आंनदसिंग बायस, नगरसेवक जालिंदर कोकणे, पं.स.मा.सदस्य दिपक रोडगे, पं.स.मा. सदस्य इंद्रजित लोमटे, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, प्रा.डि.एन. कोटरगे, अशोक क्षीरसागर, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, प्राचार्य शहाजी जाधव, राजेंद्र क्षीरसागर, मा.नगरसेवक श्रीनिवास माळी, सुग्रीव क्षीरसागर, सोमनाथ भोजणे, संजय दरेकर, बालाजी माटे, ज्येष्ठ पत्रकार निळकंठ कांबळे, गिरीश भगत, अशोक दुबे, शाखा अभियंता अरुण रोडगे, अमोल माळी,
लक्ष्मण रोडगे, दिनेश माळी, सचिन माळी, संतोष माळी, संतोष क्षीरसागर, राम क्षीरसागर, सतिश माळी, रघुनाथ माळी, ज्ञानेश्वर माळी, पंडित माळी, श्रीकांत माळी, प्रशांत क्षीरसागर, अमोल क्षीरसागर, शंकर माळी, महेश माळी, विष्णु क्षीरसागर, लक्ष्मण क्षीरसागर, सचिन करे, गुरुदेवी माळी, प्रणिता क्षीरसागर, वि.का. सोसायटी संचालक सुनंदा क्षीरसागर,सुजाता क्षिरसागर, गितांजली क्षिरसागर, भाग्यश्री काटे, मनिषा माळी, मंगल माळी, सुनिता फुलसुंदर, इंदाबाई माळी, काशीबाई माळी, निता क्षीरसागर, मनिषा फुलसुंदर, शितल माळी, शांताबाई क्षीरसागर, माधुरी गवळी, जयश्री वाघमारे, मंगल माळी, यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोक माळी यांनी केले तर आभार मा. नगरसेवक श्रीनिवास माळी यांनी मानले.