एक उत्तम व कसलेला खेळाडू कधीही आत्महत्या करत नाही – पोलिस उपनिरिक्षक एस.के.नरवडे

उस्मानाबाद : लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये शुक्रवारी 30 डिसेंबर रोजी क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी स्पर्धेचे उद्घाटक म्हणून लोहारा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक श्री एस.के.नरवडे, पो.उ.नि. गुलजरखान पठाण, प्रमुख अतिथी म्हणून ठाकरे गटाचे युवा सेनेचे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल बिराजदार, एम.के.कोळी, पालक प्रतिनिधी शिवराज झिंगाडे, स्कूलचे प्राचार्य शहाजी जाधव आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

याप्रसंगी स्कूलमधील उपस्थित विद्यार्थ्यांना श्री एस.के. नरवडे यांनी विद्यार्थ्याना आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,हार कशी पचवावी व विजय कसा साजरा करावा, हे एक उत्तम खेळाडूकडूनच शिकावे तसेच एक उत्तम व कसलेला खेळाडू कधीही आत्महत्या करत नाही, याउलट प्रतिकूल परिस्थितीत हारत असलेला सामना वा स्पर्धेत यशस्वी कसे व्हायचे हे पाहून समाजातील इतरांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे असे मार्गदर्शन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी प्राचार्य शहाजी जाधव यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की जीवनात आपणास यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येकाने आपले मन, मेंदू व मनगट निरोगी,सुदृढ व बळकट करायला हवे. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धेसंबधित खेळाडूची शपथ घेतली. याप्रसंगी व्यंकटेश पोतदार, सोमनाथ कुसळकर, यांनी स्पर्धेचे पंच म्हणून काम पाहिले.

स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सिद्धेश्वर सुरवसे, प्रेमचंद राठोड, स्वामींनी होंडराव,निलोफर बागवान, चांदबी चाऊस,सरिता पवार, मीरा माने, संतोषी घंटे,माधवी होगाडे, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता जाधव यांनी तर आभार प्रदर्शन मिस मयुरी नारायणकर यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!