तीन विद्यार्थ्यांची नॅशनल लेवल एक्झामसाठी निवड

लोहारा ( उस्मानाबाद ) : लोहारा तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कुलमधील इयत्ता सहावी व सातवी वर्गातील विज्ञान विषयाच्या ज्युनिअर आयएएस या ऑनलाईन परीक्षेत ११ विद्यार्थी सहभागी होते. त्यापैकी तीन विद्यार्थ्यांचे नॅशनल लेवल एक्झामसाठी निवड झाली आहे. यात विद्यार्थी ज्योती साळुंखे १०६ गुण, समर्थ देशमुख १०२ गुण व श्रीनिवास पोतदार ९४ गुण मिळाले आहेत. या यशाबद्दल मुख्याध्यापिका हिरा दयानंद सोलापुरे (हावळे), सुनील कांबळे,लता भोसले, सुनिता सलगर ,मनीषा तेलकर ,आशा कांबळे, सुवर्णा शिंदे, जन्नत कारभारी , शिवमाला हुडगे, ज्योती साठे आदींनी अभिनंदन केले आहे.