कलाकारांनी लावनीसह विविध गीतांवर दिलखुचक ठसकेबाज नृत्य सादर करुण उपस्थितांची मने जिंकली

जेवळी, ( ता. लोहारा ) : 
ग्रामदैवत महात्मा बसवेश्वर यात्रेनिमित्त आयोजित राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता.२०) विविध ठिकाणाहून आलेल्या कलाकारांनी लावनीसह विविध गीतांवर दिलखुचक ठसकेबाज ,नृत्य सादर करुण उपस्थितांची मने जिंकली
यात्रा समितीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय संस्कृती नृत्य स्पर्धेच्या दुसरया दिवशी गुरवारी (ता.२०) पार पडलेल्या प्रौढ गटातील वैयक्तिक नृत्य स्पर्धेचे (स्त्री, पुरुष) उद्घाटन प्राथमिक सहकारी पत्त संस्थेचे माजी अध्यक्ष शामसुंदर पाटील यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीज महावितरण कंपनीचे निवृत्त उपअभियंता विरपक्ष स्वामी हे होते.

यावेळी प्राचार्य दयानंद कापसे, मुख्याध्यापक यादव कांबळे, देविदास साळुंके, माजी मुख्याध्यापक शिवाजी माळी, प्रगतीशील शेतकरी विलास कारभारी, अभियंता अभिजित पाटील, टीव्ही कलाकार सुवर्णा देसाई- कांबळे, योगिराज सोळसे, धनराज शिंदखेडे, मेहुल कारभारी, बसवंत हावळे, सुभाष सारणे, रोहित कारभारी, रमेश निंगशेट्टी, सोमनाथ चिनगुंडे, गुरुनाथ कोळी, प्रदीप सारणे, दिलीप भैराप्पा, दत्तात्रय ढोबळे, कोंडिबा मोकाशी, संजय राजपूत, महादेव सारणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी प्रौढ गटातील वैयक्तिक नृत्य स्पर्धा (स्त्री, पुरुष) पार पडल्या यात ठिक ठिकाणांहून आलेल्या कलाकारांनी विविध चित्रपट गिते, शेतकरी गिते, लोकगिते, शास्त्रीय नृत्यातून आपल्या नृत्य आविष्काराचे उत्कृष्ट सादरी करीत प्रेक्षकांना डोलायला लावले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!