लोहारा (जि.धाराशिव) : लोहारा तालुक्यातील कास्ती (बु) या गावाचे ग्रामदैवत श्री कल्लेश्वर मंदिर हे गावकऱ्यांचे श्रद्धास्थान. या मंदिराच्या शिखर जिर्णोद्धार व बांधकामासाठी गावातील समाजसेविका कस्तुरबाई बाबाराव चव्हाण यांनी तब्बल १५ लाख २१ हजार रुपयांची देणगी देवस्थान समितीला प्रदान करून आपल्या दानशूरतेचा व गावाप्रती असलेल्या जिव्हाळ्याचा ठसा उमटविला आहे.

या उदार देणगीतून मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन कस्तुरबाई चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. मंदिराच्या उभारणीमुळे गावातील धार्मिक कार्यांना नवे बळ मिळणार असून सामाजिक एकात्मतेलाही चालना मिळणार आहे.
या कार्यक्रमाला तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष नागण्णा वकील, देवस्थान समिती अध्यक्ष राजेंद्र पाटील, तसेच परवेज तांबोळी, प्रदीप भरगांडे, पापा पाटील, शरद साबळे, हारीदास चव्हाण, आनंद पाटील, पंडित परसे, बालाजी परसे, जीवन हारीदास कोळी, बालु मुंडे, आकाश पाटील, कृष्णात समदळे, नवलिंग शेगजी आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
गावातील नागरिकांनी कस्तुरबाई चव्हाण यांच्या या कार्याचे मनापासून स्वागत केले असून मंदिराच्या जिर्णोद्धारामुळे गावाचे धार्मिक व सांस्कृतिक वैभव अधिक वृद्धिंगत होणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
Back to top button
error: Content is protected !!