नात्यातील गोडवा जपणारे चितळे बंधू मिठाईवाले आता रावेतकरांच्या सेवेत

रावेत : (प्रतिनिधी)

चितळे बंधू आणि पुणे यांचं अनोखं नातं आहे. आता ‘चितळे बंधू‘ आता रावेत मध्ये सज्ज झाले आहे. रावेत प्राधिकारणातील सेक्टर २९ मधील मुख्य मार्गावर असणाऱ्या ‘चितळे बंधू’च्या दुकानाचे उद्घाटन नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.‘हमारे पास चितळें की बाकरवडी हैं’ ही पुणेकरांच्या दृष्टीनं खरंच अभिमानाची गोष्ट ! हेच नात्यातील गोडवा जपणारी अभिमानाची गोष्ट चितळे बंधू मिठाईवाले आता रावेतकरांच्या सेवेत नुकतेच सुरू झाले आहे.
रावेतकरांना आता चितळेंची बाकरवडी, श्रीखंड, लोणी, तूप चाखायला मिळणार आहे. चितळे बंधूंची उत्पादने आतापर्यंत देश-विदेशाता विविध ठिकाणी पोहचली होती. मात्र रावेत येथे चितळेंचे दुकान उघडल्यामुळे रावेतकर खुश आहेत.चितळेंची मिठाई म्हणजे एक सांस्कृतिक ठेवा आहे. पाडव्याला किंवा इतर सणांना चितळेंची मिठाई एकमेकांना देणे हा एक उत्सव असल्यासारखं वाटतं. ही संस्कृती आता रावेतकरांना अनुभवायला मिळणार असल्याने याचा मोठा आनंद आहे अशी भावना नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी व्यक्त केलि. यावेळी माजी विरोधीपक्ष नेते राजू मिसाळ नगरसेवक मयूर कलाटे इंद्रनिल चितळे,केदार चितळे,दक्षता सामंत यांच्यासह चितळे बंधू उद्योग समूहची टीम देखील उपस्थित होते.
गुणवत्तेमध्ये तडजोड नाही, स्वच्छ आणि ताज्या मालाची विक्री हे सूत्र घेऊन पुण्यासह विविध देशांतही चितळे मिठाईची विक्री होते. बाकरवडीचं नाव जरी काढलं तरी सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि ती बाकरवडी चितळेंची असेल तर मग तिची बातच काही और आहे. खरं तर बाकरवडी म्हटलं की चितळेंचच नाव समोर येतं.बाकरवडी आज त्यांची ओळखच बनली आहे हे हि म्हणायला हरकत नाही. बाकरवडी म्हणजे चितळे हे समीकरण जगाच्या हृदयात अगदी घट्ट बसलंय आणि का नाही बसणार? हीच सेवा आता रावेतकरांना अनुभवता येणार आहे.
विविध स्वरुपाची मिठाई आणि रुचकर खाद्यपदार्थांसाठी चितळे यांच्या पुण्यातील दुकानात सकाळी आणि सायंकाळी नेहमीच गर्दी असते. उदघाटनाच्या पहिल्याच दिवशी रावेतकरांनी मिठाई घेण्यासाठी गर्दी केली होती. चितळेंची प्रसिद्ध असलेली बाकरवाडी यापूर्वीही रावेत मध्ये मिळत असली तरी आता सर्वच मिठाई एकाच छताखाली मिळणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

आंबा बर्फी असो वा चक्का आणि बाकरवडी असो वा पेढे, ‘चितळे बंधू मिठाईवालें’कडे मिळणाऱ्या अशा चविष्ट खाद्यपदार्थांसाठी रावेतकरांना आता इतरत्र जावे लागणार नाही.विविध स्वरूपाची मिठाई आणि रुचकर खाद्यपदार्थांसाठी चितळे यांच्या दुकानात सकाळी आणि सायंकाळी नेहमीच गर्दी असते. बाकरवडी आज त्यांची ओळखच बनली आहे हे हि म्हणायला हरकत नाही. “बाकरवडी म्हणजे चितळे” हे समीकरण जगाच्या हृदयात अगदी घट्ट बसलंय ते रावेतकरांच्या सुद्धा हृदयात बसण्यासाठी सज्ज झाले आहे.
पत्ता : सेक्टर 29 प्लॉट क्रमांक 87 युनिटी बँक समोर
डॉ डी वाय पाटील कॉलेज मार्ग, रावेत प्राधिकरण

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!