लोहारा शहरात बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेचा खा. ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते शुभारंभ

लोहारा ( जि.उस्मानाबाद ) : लोहारा शहरातील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या नगरसेविका मयूरी बिराजदार यांनी सुरू केलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेचा शुभारंभ रविवारी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते नव वधूला पाच ग्रॅम सोन्याची अंगठी देऊन करण्यात आला.
शहरातील प्रभाग सहामधील शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवका मयूरी बिराजदार या विविध उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करीत असतात. सामान्य व गरीब कुटुंबातील मुलींचा सन्मान व्हावा व त्यांना कोणत्या ना कोणत्या रूपात मदत मिळावी, त्यासाठी नगरसेविका बिराजदार यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजना सुरू केली आहे. आज रविवारी शहरातील रघुवीर घोडके यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात खासदार राजेनिंबाळकर यांच्या हस्ते नव वधू शिल्पा हिस पाच ग्रॅम सोन्याची अंगठी देऊन कन्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नागण्णा वकील, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, महेबूब गवंडी, पंचायत समितीचे माजी सभापती विलास भंडारे, दत्तात्रय बिराजदार, नामदेव लोभे, माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके,शहाजी जाधव,अंबादास विरोधे,विकास घोडके, नितीन जाधव, प्रेम लांडगे, रवि कुलकर्णी, जगदीश लांडगे, प्रकाश भगत, राजेंद्र रवळे, तानाजी घोडके, आप्पू स्वामी आकाश विरोधे, राहुल विरोधे उपस्थित होते.

🔴 या पुर्विही प्रभाग ६ मधिल नागरीकांसाठी ते रहात असलेल्या घराच्या घरपट्टित कै.विश्वनाथराव गायकवाड कर सवलत योजनेच्या माध्यमातुन १०% सुट देण्यात येते आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!