रस्त्यांची दुरवस्था ; विद्यार्थ्यासह पालकांची गैरसोय

लोहारा ( उस्मानाबाद ) : लोहारा शहरातील प्रभाग क्रमाक १० मधील न्यायालय ते न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलपर्यतच्या चारशे मिटर रस्त्याची दुरवस्था झाल्याने पावसाळ्यात विद्यार्थ्यासह पालकांना जाता येताना तारेवरची कसरत करावी लागल आहे. यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देऊन रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी होत आहे.

लोहारा शहर हे तालुक्याचे ठिकाण असून त्यात भुकंपग्रस्त आहे. नविन जागेवर शहर वसलेले आहे.ग्रामपंचायत असताना अपुऱ्या निधी अभावी सोयी सुविधा पुरवणे शक्य नव्हते. त्यात तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा मिळाला. याला सहा वर्षे झाली. या सहा वर्षात लोखो रुपयांचा निधी शहराला आला. यातून मोठ्याप्रमाणात सिमेंट रस्ते व गटारी करण्यात आल्या. त्यात तुरळक लोक वस्ती असलेल्या ठिकाणी सिमेंट रस्ते झाले.

लोकवस्ती असलेल्या काही भागात अजून नागरीक रस्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. त्यातच शहरातील प्रभाग क्रमाक १० मधील तालुका न्यायालय ते न्यू व्हिजन इंग्लिश स्कूमपर्यतच्या चारशे मिटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना सततच्या पावसामुळे चिखल व पाण्यातूनच आपली शाळा गाठावी लागते. बालवाडी ते आठवी पर्यत असून चारशेवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

त्या लहान चिमुकल्यांना 400 मीटर अंतर चिखल व पाण्यातून शाळा गाठण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे. यामुळे नगरपंचायत प्रशासनाने लोकवस्ती असलेल्या भागासह शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी नागरीकांतून करण्यात येत आहे.



