नूतन सिनेट सदस्य अश्लेष मोरे यांचा व्यापाऱ्याकडून सत्कार

उमरगा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सिनेट सदस्य अश्लेष मोरे निवडून आल्याबद्दल उमरगा शहरातील भारत विद्यालय व्यापारी संकुल मधील व्यापारी कडून शुक्रवारी १६ डिसेंबर रोजी जाहीर सत्कार संपन्न करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती विलासा राजोळे हे होते तर प्रमुख पाहुणे नितीन होळे, डॉ. नरवाडे,डॉ.अनिकेत इनामदार,बालाजी मोरे, प्रमोद इंगाळे होते. यावेळी व्यापारी सागर पुजारी,डॉ. निलगार, बाबा सालुखे, सचिन माशाळकर,माजी नगरसेवक बालाजी पाटील आदी व्यापारी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय देशमुख यांनी केले.