बेंडकाळ येथे नेत्यांना प्रवेश बंदी करून निवडणुकीवर बहिष्कार

लोहारा / प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील बेंडकाळ येथील ग्रामस्थांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण मिळवण्यासाठी ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकून आमदार खासदार तसेच कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना गावात प्रवेश बंदी केली असून येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीवर देखील बेंडकाळ ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्याचे प्रतिक्रिया दिल्या आहेत,
मराठा आरक्षण मिळवण्यासाठी व मनोज दादा जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी बेंडकाळ येथे शुक्रवारी सकाळी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,
यावेळी ग्रामस्थांनी यापूर्वीच ठरवल्याप्रमाणे कुठल्याही निवडणुकीमध्ये बेंडकाळ ग्रामस्थांनी सहभाग न घेता व कुठलेही राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेश बंदी करून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी महेश देशमुख, ग्रामपंचायत सदस्य अनिल पवार, सहदेव गोरे, बालाजी पाटील, महेश गोरे, दिलीप कदम,बळी मोरे,बाळु गोरे, प्रमोद गोरे प्रणित गोरे, ज्ञानेश्वर गोरे, ओम प्रकाश गोरे, गुणवंत गोरे , सुरेश जाधव, दशरथ थोरात, आदी उपस्थित होते.