आपल्या धर्म पत्नीच्या माध्यमातून सत्ता आपल्याकडेच असावी यासाठी गाव पुढारी सरसावले

सुधीर कोरे जेवळी, ( जि.उस्मानाबाद ) :
लोहारा तालुक्यातील जेवळी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत आपल्या धर्म पत्नीच्या माध्यमातून सत्ता आपल्याकडेच असावी यासाठी जेवळी येथील प्रस्थापित गाव पुढारी सरसावले आहेत.
जेवळी येथील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. येथील सरपंच पद हे सर्वसाधारण महिलेसाठी असून आपल्या धर्म पत्नीच्या माध्यमातून सत्ता आपल्याकडेच असावी यासाठी येथील प्रस्थापित गाव पुढारी सरसावले आहेत. यावेळी सरपंचासाठी पंचरंगी तर सदस्यासाठी तिरंगी लढत होत आहे.
लोहारा तालुक्यात लोकसंख्येने सर्वात मोठे व सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या महत्त्व असल्याने जेवळी येथील निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष असते अलीकडे येथील प्रत्येक निवडणुकीत जिल्हा व तालुकास्तरीय पुढार्यांच्या सक्रिय सहभागाबरोबरच पैसा व प्रतिष्ठेचा मोठ्या प्रमाणात वापरामुळे येथील निवडणुका चुरशीच्या होत आहेत. आता शासनाकडून ग्रामपंचायतला थेट व भरीव निधी उपलब्ध होत असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीला विशेष महत्त्व आले आहे. येथे प्रत्येक निवडणुकीत गट- तट, पक्षभेद बाजूला सारून गाव पुढार्यांच्या सोयीनुसार नवीन आघाड्या निर्माण होताना दिसून येतात. गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एक -एकमेका विरुद्ध लढलेले शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान सरपंच मोहन पणुरे व मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती बसवराज कारभारी हे यावेळी एकत्र येत पॅनल बनविले आहेत.
तर विद्यमान सरपंच मोहन पणुरे व उपसरपंच मल्लिनाथ डिग्गे यांच गेल्या निवडणुकीत एकत्र पॅनल असताना आता ते एकमेका विरुद्ध लढताना दिसून येत आहे. तसेच गेल्या निवडणुकीत बसवराज कारभारी व रोजगार हमी योजनेच माजी तालुकाध्यक्ष श्यामसुंदर तोरकडे यांचे एकत्रित पॅनल असताना यावेळी मात्र एकमेकांविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथे प्रत्येक वेळी नवीन आघाड्या बघायला मिळतात यावेळी येथील सरपंच पद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. सरपंच पदासाठी पंचरंगी व चुरशीची लढत होत आहेत. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान सरपंच मोहन पणुरे व मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती बसवराज कारभारी यांच्या नेतृत्वाखाली श्री बसवेश्वर ग्राम विकास पॅनलकडून सरपंच पदासाठी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ महानंदा मोहन पणुरे, रोजगार हमी योजनेचे माजी तालुकाध्यक्ष श्यामसुंदर तोरकडे व माजी उपसरपंच भोजप्पा कारभारी यांच्या नेतृत्वाखालील शिवकृपा ग्राम विकास पॅनल कडून विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सौ. शोभा शामसुंदर तोरकडे, विद्यमान उपसरपंच मल्लिनाथ डिग्गे व माजी चेअरमन श्यामसुंदर पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री बसवेश्वर परिवर्तन महाविकास आघाडीकडून सरपंच सौ अनिता मल्लिनाथ डिग्गे, विका सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष मल्लिनाथ वलदोडे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी पुरस्कृत ग्राम विकास परिवर्तन पॅनलकडून सौ. सुवर्णा मल्लिनाथ वलदोडे व सामाजिक कार्यकर्ता सुभाष सारणे यांच्या नेतृत्वाखालील व्यापारी नवरात्र मंडळ पुरस्कृत पॅनलकडून सौ चिमाबाई सुभाष सारणे हे सरपंच पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर सदस्यासाठी प्रभागात पंचायत समितीचे माजी सभापती सौ विजया गाडेकर, मुरूम बाजार समितीचे उपसभापती बसवराज कारभारी, विद्यमान उपसरपंच मल्लिनाथ डिग्गे, माझी उपसरपंच सुभाष बिराजदार, विकास सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष मल्लिनाथ वलदोडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संघटक धनराज बिराजदार, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नागनाथ पणुरे, गोविंद जेवळीकर, सुभाष जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्या दुर्गाबाई चव्हाण, वकील सतीश शेट्टी हे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत
यावेळी येथील निवडणूकीत जिल्हा व तालुका स्तरावरील पुढाऱ्याबरोबरच येथील निवडणुकीत आजी- माजी जिल्हा परिषद सदस्या, पंचायत समितीचे माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, माजी सरपंच, आजी- माजी उपसरपंच, विका सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष, ग्रामपंचायत माजी- माजी सदस्य व वकील मंडळीसह विविध संघटनेचे पदाधिकारी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने येथील निवडणूक मोठी रंगतदार व चुरशीच्या होत आहेत.
🔴 सतरा सदस्यां पैकी बसवेश्वर ग्राम विकास पॅनलचे सौ चांदणी ढोबळे, सौ सुनिता स्वामी व सौ सुहाना मुल्ला या तीन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे