लोहारा तालुक्यातील काँग्रेसच्या सरपंचाचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

लोहारा : लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथील काँग्रेस पक्षाचे सरपंच सचिन व्यंकट रसाळ यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. उमरागा येथील आयोजित कार्यक्रमामध्ये त्यांचा पक्ष प्रवेश झाला. आमदार ज्ञानराज चौगुले यांचा येथोचित सत्कार करून प्रवेश दिला. यावेळी युवा नेते किरण गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, लोहारा तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, उमरगा तालुकाप्रमुख बळिराम सूर्यवंशी, बाजार समितीचे माजी सभापती सुलतानशेठ, जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमर कदम,शेतकरी सेनेचे विलास भगत, उपतालुकाप्रमुख व्यंकट पाटील, शेखर पाटील, दिपक जोमदे, लोहारा उपतालुकाप्रमुख परवेज तांबोळी, अनंत बायस, संदीपान बनकर, परमेश्र्वर साळुंखे, माजी गटनेते अभिमान खराडे, लोहारा नगरसेवक अमीन सुंबेकर, अविनाश माळी, गौस मोमीन आयुब शेख, ओम कोरे, दिपक रोडगे, प्रमोद बंगले, उमरगा माजी नगरसेवक संतोष सगर, पंढरीनाथ कोणे, सचिन जाधव शरद पवार अमृत वर्णळे भगत माळी संदीप चौगुले अमर शिंदे हनुमंत गुरव, हनुमंत कोकाटे, माधव जाधव, सुरेश देशमुख, वैभव पवार, श्रीशैल ओवांडे, विनोद मुसांडे, अरुण जगताप, नाना मदनसुरे, अमोल सोमवंशी आदी पदाधिकारी विभागप्रमुख व गणप्रमुख मोठया संख्येने उपस्थित होते.