लोकनृत्य स्पर्धेत निवासी दिव्यांग शाळेचा संघ ठरला जिल्हास्तरावर अव्वल

लोहारा (उस्मानाबाद ) : जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील निवासी दिव्यांग शाळेचा संघ ठरला अव्वल ठरला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प २०२२-२३ अन्वये भूमिका अभिनय व लोक नृत्य स्पर्धा २०२२ या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन गुरुवारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद येथे करण्यात आले होते.


या स्पर्धेत लोहारा तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेने भूमिका अभिनय तसेच लोकनृत्य जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये दोन संघ सहभागी झाले होते. लोकनृत्य स्पर्धेसाठी मुले व मुलींसाठी समान संधी, मुलांच्या विकासात संयुक्त कुटुंबाची भूमिका, पर्यावरण संरक्षण, मादक द्रव्याचे सेवन रोखणे, प्रौढावस्थेतील निरोगी नातेसंबंध हे विषय सादरीकरणासाठी होते. निवासी दिव्यांग शाळेतील दिव्यांग विद्यार्थी अल्ताफ रऊफ चौधरी, संध्याराणी बिभीषण कदम, किरण बाळू खराते, सूर्या लहू शिंदे,भाग्यश्री कांबळे, महेश पवार, भाग्येश इस्लामपूरे, आदिती गायकवाड या विद्यार्थ्यांनी मुले व मुलींसाठी समान संधी या विषयावर बहारदार लोकनृत्य सादर करून उपस्थित प्रेक्षकांची व परीक्षकांची मने जिंकून लोकनृत्य स्पर्धेत जिल्हास्तरावरील प्रथम पारितोषिक पटकावले.

सदर स्पर्धेत प्रत्येक तालुक्याच्या तालुकास्तरीय स्पर्धा मधून प्रथम क्रमांकाचा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सहभागी झाले होते. स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक परंडा तालुक्यातील जवळा येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, तर तृतीय क्रमांक वाशी येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेला मिळाला आहे. पुढील आठवड्यात विभागीय स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धेसाठी सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेचा संघ पात्र ठरला आहे. विजेत्या संघातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेतील सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रवीण वाघमोडे,अंजली चलवाड, शंकरबाबा गिरी, सुरेखा परीट, संजय शिंदे आदींचे मार्गदर्शन लाभले.

सदर स्पर्धेचे पारितोषिक वितरण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्रचार्य डॉ. दयानंद जटनूरे, डायटच्या लोकसंख्या शिक्षण विभागाच्या आधिव्याख्याता सुचित्रा जाधव, डायटचे अधिव्याख्याता डॉ. सलगर, पौळ, स्पर्धेचे परीक्षक राजेंद्र अत्रे, विवेक कोरे,भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्या संघातील दिव्यांग विद्यार्थ्यांचे लोहारा पंचायत समितीच्या प्रभारी गटशिक्षण अधिकारी रंजना मैंदर्गी,माकणी बीटचे विस्तार अधिकारी शिवकुमार बिराजदार स्पर्धेचे लोहारा तालुका समन्वयक एस.एम.काळे ,सुधाकर मुगळीकर, केंद्रप्रमुख नयन शेख, संस्थेच्या सचिव निर्मलाताई बदामे, मुख्याध्यापक.बी.टी. नादरगे आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!