जेवळी येथील श्री बसवेश्वर हायस्कूल शाळेच्या संघाने पटकावले विजेतेपद

उस्मानाबद : शुक्रवारी ९ डिसेंबर रोजी आचलेर येथे शाळेय तालुका स्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तरी आचलेर येथे आयोजित तालुका शालेय स्तरीय स्पर्धे मध्ये अनेक शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते . 17 वयोगट स्पर्धेचा अंतिम सामना धानुरी विरुद्ध श्री बसवेश्वर हायस्कूल शाळा जेवळी असा सामना रंगला होता. व तसेच अंतिम सामन्यामध्ये श्री बसवेश्वर हायस्कूल शाळा जेवळी संघांनी विजेते पद पटकावले. व तसेच श्री बसवेश्वर हायस्कूल शाळा जेवळी हा संघ जिल्हा स्तरीय स्पर्धे साठी पात्र ठरला आहे .तरी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना ढोबळे सर, पाटील सराचे व संभाजी ब्रिगेड लोहारा तालुका विद्यार्थी आघाडी अध्यक्ष गणेश सुरवसे या स्पर्धेसाठी यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन होते. स्पर्धेतील विद्यार्थी कुणाल गुंजोटे (C),वेदांत धरणे ,सनी क्षीरसागर ,राहुल कलशेट्टी ,सुमित माळी ,ऋषीकेश पाटील ,ऋषिकेश सुरवसे ,सुयश कारभारी ,विनय कोरे ,अनिकेत दंडगुले ,प्रसाद पाटील ,रंजीत घोरपडे ,अभिषेक जाधव या सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी श्री बसवेश्वर हायस्कूल जेवळी शाळेतील असंख्य माझी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.रविराज सोळसे,पृथ्वीराज कारभारी, यांनी उपस्थिती लावली होती.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!