करजखेडा येथे “परिवर्तन महोत्सव-२०२२” जल्लोषात साजरे

उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा येथे खंडोबा यात्रेच्या निमित्ताने “परिवर्तन महोत्सव” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या परिवर्तन महोत्सवाचे हे ९ वे वर्षे आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेंबळी पोलीस ठाण्याचे पो.नि. मच्छिंद्र शेंडगे हे होते तर प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध मिमिक्री कलाकार योगेश सुपेकर हे होते. याप्रसंगी माजी सरपंच नंदकुमार माळी, शमाजी प.सं.सदस्या प्रणिता क्षिरसागर, पोलीस पाटील अनंत आदटराव,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रवी आदटराव, परिवर्तन महोत्सवाचे कार्याध्यक्ष जयंत आदटराव, माजी उपसरपंच तात्याराव शिंदे बालाजी सुरवसे,माजी चेअरमन भुजंग पाटील, लक्ष्मण शिंदे, बालाजी लोखंडे आदी उपस्थित होते. परिवर्तन परिवाराचे कार्यकर्ते शंकर वैरागकर यांचे दोन महिन्यापूर्वी आकस्मिक निधन झाले होते. त्यांना आदरांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी यात्रेसाठी आलेल्या भाविक भक्तांचे ग्रामस्थांचे मनोरंजन,प्रबोधन व लोकशिक्षण करत असतानाच गावात चांगले काम केलेल्या लोकांच्या पाठीवर कौतुकाची थाप या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली जाते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवी आदटराव यांनी केले. तर शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न कसे वाढवावे या विषयी गणेश आदटराव यांनी मार्गदर्शन केले. सिनेकलाकार योगेश सुपेकर यांनी एकपात्री प्रयोगासह अनेक राजकीय नेत्यांचे आवाज काढून उपस्थितांचे मनोरंजन केले. सहभागी कलाकारांच्या कलाविष्काराने उपस्थितांचे मनोरंजन व प्रबोधनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर लावणी, लघुनाटिका, भारुड पोवाडे आदी सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. प्राची जाधव, प्रांजली जाधव , अनामिका अहिरे, श्वेता अवसरमोल, आशिष थोरात, शाहीर व्यवहारे या कलाकारांनी रंगत आणली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अच्युत आदटराव व शाहूराज दबडे यानी केले. तर आभार उध्वव कळसुले यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिवर्तन फौंडेशनचे अनिल दुधभाते, तुकाराम सुरवसे,लखन पवार, अमृत सुरवसे, बालाजी देवकर , लक्ष्मण बनकर,भैरवनाथ म्हेत्रे,अजित कंदले,अनिल आदटराव, कपिल चव्हाण, दयानंद वाघे,हनुमंत आदटराव,रमेश आदटराव,माऊली पांचाळ, रामेश्वर वेळापुरे,तुकाराम आदटराव,अमोल चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.