पोलीस भरती पूर्व मार्गदर्शन शिबीर व आय सीड वेबसाईट अनावरण सोहळा उत्साहात संपन्न

लोहारा : लोहारा तालुक्यातील माकणी येथे ग्रामीण भागातील पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या युवक-युवतींसाठी माकणी येथे ‘आय सीड फाउंडेशन आणि डॉ. पवन साठे प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘पोलीस भरती पूर्व मार्गदर्शन शिबीर’ व ‘आय सीड वेबसाईट अनावरण सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम डॉ. पवन साठे यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून व श्रद्धांजली वाहून सुरवात करण्यात आला.                  मार्गदर्शन शिबिरास प्रमुख मार्गदर्शक म्हणून लोहारा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस निरीक्षक मा. अजित चिंतले व सहकारी हे लाभले होते. त्याचबरोबर प्रमुख पाहुणे पंडित साठे गुरुजी, गावातील शिक्षक गौरीशंकर कलशेट्टी, गणेश साठे, गावातील महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत कर्मचारी बाळासाहेब ओवांडकर, दादासाहेब रोकडे, आय सीड संस्थेचे संस्थापक विष्णू शिंदे व एम एस इ बी मध्ये कार्यरत उपकार्यकारी अभियंता वैभव गायकवाड हे लाभले होते.

कार्यक्रमात आय सीड फाउंडेशनच्या www.iseed.co.in या वेबसाईटचे अनावरण पो.नि. अजित चिंतले यांच्या सुभहस्ते करण्यात आले. आय सीड या सामाजिक संस्थेची वेबसाईट ‘आयरो सिस्टिम्स प्रा. लि., पुणे’ या कंपनीने मोफत तयार करून दिली आहे. कंपनीचे संचालक मा. सौरभ कर्णिक हे ऑनलाईन उपस्थित होते, त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये ‘त्यांनी आय सीड करत असलेले सामाजिक काम हे खूप शाश्वत आहे. त्यासाठी भविष्यात सर्वप्रकारे मदत करणार आहोत’ अशी ग्वाही दिली. तर बऱ्याच प्रयत्नानंतरही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. श्रुती तांबे या तांत्रिक आडचणीमुळे जोडू शकल्या नाहीत,त्यांनी मेसेजद्वारे सर्वांना शुभेच्छा दिल्या.

पोलीस भरती पूर्व मार्गदर्शन शिबीरामध्ये ‘मानसिक तान व्यवस्थापन’ याविषयावर प्रा. विष्णू शिंदे, ‘मैदानी परीक्षेची तयारी’ याबाबत आर्थिक गुन्हे शाखा, लातुर येथिल पोलीस कर्मचारी बाळासाहेब ओवांडकर, ‘लेखी परीक्षेची तयारी’ याबाबत शिक्षक गौरीशंकर कलशेट्टी व युवक-युवतींचा उत्साह उंचावण्यासाठी अनुभवआधारित शिक्षक गणेश साठे व अ्ँड दादासाहेब जाणकर यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शक पो.नि.अजित चिंतले यांनी “पोलीस भरतीला सामोरे जाताना कठोर परिश्रम करणे अनिर्वार्य आहेच, त्याशिवाय ग्रामीण भागातील तरुणांची उन्नती होणार नाही व या प्रकारच्या शिबिरांची ग्रामीण भागात आयोजन होणे खरच कौतुकास्पद आहे, यासाठी आय सीड फाउंडेशन आणि डॉ. पवन साठे प्रतिष्ठान यांचे आपण आभार मानले पाहिजे” असे प्रतिपादन त्यांनी केले. आयोजित कार्यक्रम तीन तासाहून अधिक तास चालला यामध्ये मार्गदर्शना बरोबरच युवक-युवतींना टी-शर्ट वाटप करण्यात आले. कार्यक्रमास साठहून अधिक तरुण व तरुणी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी बादल साठे या तरुणाने ‘असा कार्यक्रम आम्ही पहिल्यांदा पाहत आहोत, मिळालेल्या मार्गदर्शनाने आम्हाला स्फुर्ती मिळाली आहे, आम्ही उद्यापासून जोमाने तयारी करू’ असे मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गौरीशंकर कलशेट्टी यांनी केले तर समारोप आय सीडचे कार्यकारी संचालक महेश शिंदे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!