राजकीय

लोहारा तालुक्यात सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीसाठी बैठक

लोहारा (ता.प्र.): लोहारा तालुक्यातील एकूण 44 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या 2025-2030 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरक्षण ठरविण्याच्या उद्देशाने दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती मीटिंग हॉल, लोहारा येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.

ही आरक्षण प्रक्रिया मा. उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून, संबंधित ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले जाणार आहे.

या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी पत्रकार बांधवांना तसेच स्थानिक प्रतिनिधींना आवाहन करण्यात आले असून, तहसीलदार लोहारा यांनी याची अधिकृत घोषणा केली आहे.

 

HTML img Tag Simply Easy Learning


 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!