लोहारा तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीसाठी ७१.१८ टक्के मतदान

लोहारा : लोहारा तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान झाले. सरपंचासाठीच्या ३५ तर सदस्यपदासाठीच्या २६१ उमेदवारांचे रींगणात आहेत. यासाठी ७१.१० टक्के मतदान झाले आहे.
लोहारा तालुक्यातील १३  ग्रामपंचायतीच्या पंचवार्षीक  निवडणूक होत आहेत. यामध्ये वडगाव (गां) ही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध निघाली आहे. उर्वरीत माकणी, सास्तूर, जेवळी, अचलेर, सालेगाव, तोरंबा, वडगाव, उंडरगाव, नागूर, विलासपूर (पांढरी), हिप्परगा (रवा), माळेगाव या १२ ग्रामपंचायतसाठी निवडणूक होत आहे. मागील महिनाभरांपासून तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे वातावरण कमालीचे तापले आहे. सरपंचपदाच्या १२ जागांसाठी ३५ तर सदस्यपदाच्या १२० जागांसाठी २६१ उमेदवार निवडणूकीच्या रींगणात आहेत. थेट जनतेतून सरपंचपदाची निवड होत असल्याने प्रत्येक गावांमध्ये अत्यंत अतितटीच्या लढती होत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning

सकाळी अकरा वाजेपर्यंत २९.५ टक्के मतदान झाले. दुपारी दीडपर्यंत मतदानाची गती वाढत ४६.२० टक्के मतदान झाले. दुपारी साडेतीनपर्यंत ६०.२ टक्के मतदान झाले. यात १० हजार ४१५ महिला तर ११ हजार १२१ पुरूष मतदारांनी मतदान केले. तर एकुण ३५७४८ मतदारापैकी २५४४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात पुरुष १३६५८ तर स्ञी ११७८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

 

 

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!