लोहारा शहरात ऊसाची ट्रॉली पलटी एक तास वाहतूक ठप्प

लोहारा ( उस्मानाबाद ) : लोहारा शहरातील महात्मा बसवेश्वर चौकात रविवारी दुपारी पावने दोनच्या सुमारास ऊस घेऊन जाणाऱ्या टॅक्टरच्या दोन ट्रॉली पैकी एक ट्रॉली पलटी झाल्याने एक तास वाहतूक ठप्प झाली होती.

HTML img Tag Simply Easy Learning


लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल माऊली साखर कारखाण्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या टॅक्टरच्या (MH26 BC3753) दोन ट्रॉली पैकी मागील एक ट्रॉली अचानक लोहारा शहरातील महात्मा बसवेश्वर चौकात रविवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास पलटी झाली.

पलटी झाल्याचे लक्षात येताच टॅक्टर चालक अनंद बदेवाड यांनी टॅक्टर थांबवले. सुदैवाने टॅक्टरच्या बाजूने कोणते ही वाहन जात नसल्याने अनर्थ टळला आहे. ट्रॉलीमधील ऊस रस्त्यावर पडल्याने तासभर वाहतूक ठप्प होती. रस्त्यावरील ऊस काढल्यानंतर वाहतुक सुरळीत सुरु झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!