महाराष्ट्र

लोहारा शहरात बुधवारपासून अखंड हरिनाम सप्ताह

लोहारा ( धाराशिव ) : लोहारा शहरात बुधवारी (१५ जानेवारी) पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,अखंड हरिनाम नाम सप्ताह व रामकथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

लोहरा बसस्थानकाच्या शेजारी हायस्कूल मैदानावर होणाऱ्या रजत मोहत्सवी (२५ वर्षे) वर्षे आहे. या मुळे या सोहळ्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असून या साठी नामवंत संत, महाराज हजेरील लावणार आहेत. गुरुवर्य रामराव ढोक महाराज (नागपूर), विनोदाचार्य केशव उखलिकर महाराज, श्रीजयश भाग्यवंत (श्रीमलंगगड, डोंबवली मुंबई), उल्हास सुर्यवंशी (आळंदी), योगीराज गोसावी महाराज (पैठण), गुरुवर्य विठ्ठल वासकर महाराज, गुरुवर्य महेश महाराज माकणीकर, गुरुवर्य गुरुबाबा औसेकर महाराज, गुरुवर्य विठ्ठल दि‌ंडेगावकर महाराज आदी नामवंत महाराजांचे किर्तन होणार आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning

२३ जानेवारीला गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर काल्याचे किर्तन व काला वाटप होणार आहे. माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या कडून महाप्रसादाचे वाटप होणार आहे. अमोल पल्ले महाराज लातूर हे व्यासपीठ अधिकारी राहणार आहेत. सप्ताह काळात रोज दुपारी दोन ते पाच या काळात नागपूर येथील रामायणाचार्य रामराम डोकं महाराज रामकथा सांगणार आहेत. याबरोबरच सप्ताहातील दैनंदिन काकडा, नामजप, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, हरीजागर आदी नियमित होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!