धाराशिव
हॅप डेली व रुद्र मिल्क प्रॉडक्ट्सच्या वतीने २१ नोव्हेंबरला मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर

लोहारा ( जि. धाराशिव ) : महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती व्हावी आणि त्यांना आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हॅप डेली व रुद्र मिल्क प्रॉडक्ट्स यांच्या वतीने आरोक्या दूध कंपनीच्या माध्यमातून शनिवारी (ता. २१) मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर हिप्परगा रोडवरील आझाद चौक, जगदंबा मंदिरासमोर असलेल्या जट्टे कॉम्प्लेक्समधील हॅप डेली येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे.



