उमरगा/ लोहारा : धाराशिव जिल्हा व उमरगा तालुका तेली समाज संघटनेच्या वतीने उमरगा येथील शांताई मंगल कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांचा भव्य नागरी सत्कार व समाज मेळावा उत्साहात पार पडला.
या प्रसंगी मंत्री बावनकुळे यांनी तेली समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले. “तेली समाजाची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उन्नती हीच आमची प्राथमिकता आहे. शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवू. येत्या काही महिन्यांत समाज प्रतिनिधींशी प्रत्यक्ष बैठक घेऊन अडचणी सोडवू,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष रवि कोरे (आळणीकर) यांनी संघटनेच्या उपक्रमांची माहिती दिली. शैक्षणिक मदत, शासकीय योजनांचे मार्गदर्शन, व सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम सातत्याने राबवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संत संताजी जगनाडे महाराज मंदिर उभारणीसाठी मदत, तसेच उमरगा येथे सांस्कृतिक सभागृहासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावर मंत्री बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाला माजी मंत्री बसवराज पाटील, संताजी चालुक्य, कैलास शिंदे, जिल्हा सचिव अॅड. विशाल साखरे, कोषाध्यक्ष महादेव मेंगले, जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष शशिकांत बेगमपुरे, लातूर जिल्हाध्यक्ष विश्वनाथ खडके, उमरगा तालुकाध्यक्ष संतोष कलशेट्टी, उपाध्यक्ष शिवानंद कलशेट्टी, कार्याध्यक्ष सिद्धेश्वर (पिंटू) कलशेट्टी, तालुका मार्गदर्शक बाबुराव कलशेट्टी, तसेच अनेक मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!