भाजपा लोहारा तालुका सरचिटणीसपदी फेरनिवड झाल्याबद्दल मित्र परिवाराच्या वतीने सत्कार

लोहारा/प्रतिनिधी
भाजपा लोहारा तालुका सरचिटणीसपदी इक्बाल मुल्ला यांची फेरनिवड झाल्याबद्दल लोहारा शहरात मित्र परिवाराच्यावतीने यथोचित सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी फटाक्याची आतषबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, मा.गटनेते अभिमान खराडे, बाळासाहेब पाटील, नगरसेवक गौस मोमिन, रोहयोचे चेअरमन आयुब अब्दुल शेख, भाजपा मा. जिल्हा कार्यकारिणी सदस्य कमलाकर सिरसाठ, नजीर शेख, जब्बार मुल्ला, दादाभाई मुल्ला, खाशिम मुल्ला, आदम मुल्ला, सोनु सुंबेकर, अस्लम आत्तार, इस्माईल मोमिन, शहेबाज शेख, आदि उपस्थित होते.