लोहारा ( जि.धाराशिव ) : लोहारा शहरातील जिल्हा परीषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शुक्रवार रोजी घेण्यात आला. यामध्ये इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे अन्नपदार्थ इडली दहीधपाटे ,फळांचा ज्यूस, पाणीपुरी, उसाचा रस, विविध प्रकारचे फळे, चॉकलेट्स, बिस्किट्स, पकोडे ,निलंगा राईस ,शेंगा लाडू, चिक्की ,बालुशाही, सँडविच असे अनेक पदार्थ स्वतः तयार करून विक्री करण्याचा आनंद घेतला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाची ओळख झाली.

व्यवहारातील झालेला नफा तोटा लक्षात आला. भविष्यकाळात व्यवसाय कसा करावा याची माहिती झाली. या बाल आनंद मेळाव्यासाठी माजी सरपंच शंकर अण्णा जट्टे, भगवान मक्तेदार ,नगरसेवक जालिंदर भाऊ कोकणे,हाजी बाबा शेख, विक्रांत संगशेट्टी, पत्रकार गणेश खबुले, बालाजी बिराजदार, पालक वर्ग ,महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थी ,पालक वर्ग व शहरातील नागरिक यांनी बाल मेळाव्यातील खाऊ खरेदी करून अन्नपदार्थाचा आस्वाद घेतला. आर्थिक उलाढालीस हातभार लावला व प्रोत्साहन दिले.
यावेळी मुख्याध्यापक मधुकर रोडगे,केंद्रप्रमुख मोहन शेवाळे, सुरेश अंबुरे ,मच्छिंद्र भुजबळ, दत्तात्रय फावडे , बालाजी मक्तेदार , सुर्यकांत पांढरे , अनंत सुतार , रमेश बनसोडे , बालाजी यादव ,गुरुनाथ पांचाळ ,प्रताप साळुंके ,सुरेश साळुंके, संतोष माळवदकर,महानंदा चव्हाण, वर्षा चौधरी,सचिन शिंदे, अर्चना साखरे, ज्योती पाटील ,प्रमोद सरवदे,नेहा भंडारे,सोनम कांबळे,दयानंद क्षिरसागर व अतुल भड आदी शिक्षक उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!