अंतरीक्ष सहलीसाठी निवडीबद्दल विद्यार्थ्याचा सत्कार


लोहारा : लोहारा तालुक्यातील श्रीहरी कोटा अंतरीक्ष सहल निवडीबद्दल लोहारा बीटतर्फे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लोहारा येथील विद्यार्थीनी सिमरन रसुल शेख ७४ गुण घेवून जिल्ह्यात सर्वप्रथम तसेच संध्या खंडू शिंदे या विद्यार्थीनींची जिल्हास्तरीय स्पर्धेतुन निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीटचे विस्तार अधिकारी सुभाष चव्हाण हे होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख मोहन शेवाळे, मुख्याध्यापक मधुकर रोडगे,उलन कांबळे, काकासाहेब इंगळे हे होते.
यावेळी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कंपास, शैक्षणिक साहित्य सुभाष चव्हाण यांच्यातर्फे देण्यात आले. विद्यार्थ्यांनी विमान प्रवासाबद्दल आम्हांला कुतुहल निर्माण झाले आहे.

अंतरीक्ष सहल उपक्रमामुळे आम्हांला अभुतपुर्व विमान प्रवासाचा अनुभव येणार आहे.असे मत सिमरन शेख यांनी मांडले.यावेळी राजू माळवदकर,बालाजी मक्तेदार,सहदेव ढोले,लिंबराज बनकर,विकास घोडके,मुकुंद शेटे, शिवशंकर वेलदोडे,दाजीबा साबळे, परमेश्वर सुर्यवंशी,शहाजी जाधव, अंकुश शिंदे,कुंभार आर.जी,जाधव एस.के,श्रीम.सुरेखा महाजन,काजी टी.जे,श्रीशैल्य जट्टे,प्रताप साळुंके उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!