हायस्कुल लोहारा प्रागणांत शालेय क्रिडा स्पर्धा सुरु

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा परिषद शिक्षण विभाग अंतर्गत लोहारा तालुक्यातील लोहारा बीट स्तरीय शालेय क्रिडा स्पर्धाचे सोमवारी हायस्कुल लोहारा प्रागणांत उद्घाटन संपन्न झाले.

दिनांक 26 ते 28 डिसेंबर या 3 दिवसादरम्यान लोहारा बिटमधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या क्रिडा स्पर्धाचे उद्घाटन करण्यात आले,याप्रसंगी लोहारा बिटचे शि. वि.अ.श्री सुभाष चव्हाण, केंद्रप्रमुख श्री मोहन शेवाळे, श्री गजानन मक्तेदार,मुख्याध्यापक श्री वसंत राठोड, श्री शहाजी जाधव, क्रिडा शिक्षक श्री गोपाळ सुतार,श्री नागनाथ पांढरे, श्री विवेकानंद क्षीरसागर आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून, तसेच जि.प.प्रा.मार्डी व जि. प. प्रा. शाळा खेड यांच्यात पहिल्या सामना खेळवून उद्घाटन करण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्री. सुभाष चव्हाण हे उपस्थित विद्यार्थ्यांना म्हणाले की, शालेय जीवनामध्ये खेळाचे महत्त्व खूप मोठे आहे कारण सुदृढ शरीरातच सुदृढ मन वास करत असते. यावेळी लोहारा बिटमधील शिक्षक श्री नितिन वाघमारे, श्री वैजीनाथ पाटील, श्री हणमंत देशमुख, श्री रसूल शेख, श्री शफीक गवंडी, श्री गोविंद जाधव, श्री सचिन भंडारे आदी शिक्षकवर्ग व स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेचे पंच म्हणून क्रिडा शिक्षक श्री रोहन जगताप, श्री विवेकानंद क्षीरसागर, श्री गोपाळ सुतार यांनी काम पाहिले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भीमाशंकर डोकडे तर आभार प्रदर्शन श्री मोहन शेवाळे सर यांनी व्यक्त केले.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!