शासन स्तरावर मागणीचे पत्र पाठविल्याने सुरेश पवार यांनी उपोषण सोडले

धाराशिव : लोकनेते गोपीनाथ मुंढे ऊसतोड कामगार महामंडळ महाराष्ट्र इमारत बांधकाम व इतर कल्याणकारी महामंडळाकडे मंत्रालयीन स्तरावर हस्तातरण करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे मागविल्याच्या निषेधार्थ तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालया समोर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरेश हरिश्चंद्र पवार दिनांक 13/10/2023 पासून अमरण उपोषणास बसलेले होते.
सहाय्यक समाज कल्याण विभागाच्या वतीने शासन स्तरावर मागणी विषयीचे पत्र पाठवून सदरची एक प्रत उपोषण कर्ते यांना दिले.
समाज कल्याण विभागामार्फत निरीक्षक मगर ए. एस
,निरीक्षक जगताप ए. ए, लिपिक जगताप एस. एस यांनी उपोषण स्थळी येऊन उपोषण कर्ते सुरेश पवार यांना ज्यूस पाजवून उपोषण मागे घेण्यासाठी सांगितले त्यावेळी संघटनेच्या वतीने समाज कल्याण विभागाचे आभार मानण्यात आले.