केंद्र शासनाच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने उमरगा येथे रास्ता रोको आंदोलन

उमरगा : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाया रचलेल्या राज्यघटना आणि लोकशाही व्यवस्थेची हत्या करण्याचे षडयंत्र केंद्र सरकार करीत आहे. या दडपशाहीचा धिक्कार असो याचा निषेध करण्या करीता महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवारी दिनांक 25/3/2023 उमरगा तहसिल कार्यालया समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भालेराव, उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार,महीला कांग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ.संगीताताई कडगंचे माजी सभापती नानाराव भोसले,माजी नगरसेवक विजय भैया वाघमारे ,मा नगरसेवक एम ओ पाटील ,मा नगरसेवक महेश मशाळकर,मा नगरसेवक विक्रम मस्के,अल्पसंख्याक सेल चे उपाध्यक्ष प्रा.डॉ शौकत पटेल सर,काँग्रेस चे ज्येष्ठ नेते शंकर जी पाटील,युवक काँग्रेस प्रदेश सचिव राजू मुल्ला, कांग्रेस तालुका उपाध्यक्ष राहुल वाघ, संगीता ताई पाटील ,जामदार ,अमित रेड्डी यांच्या सह कॉग्रेस पक्षाचे युवक काँग्रेस पदधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.