आविष्कार हो घडवू

🌹 आविष्कार हो घडवू🌹

विज्ञानाची कास धरू हो
तर्क -विचारांच्या जाऊ पुढे
विज्ञान प्रदर्शनातूनच मग हो
प्रयोगशील शास्त्रज्ञ घडे ;

नित्य नव्या व्यवहारातही
कामी पडे विज्ञान ,
प्रगतीच्या शिखरांवर चढण्या
देऊ -घेऊ सिद्धांताचे ज्ञान ;

प्रदर्शनातले आविष्कार पाहुनि
चक्षूच पडती थक्क ,
बालशास्त्रज्ञांचे कौतुक करण्या
फिके पडती शब्दच चक्क ;

कला संस्कृतीचे जतन करूनी
निरीक्षणक्षमता वाढवूया,
विज्ञान प्रदर्शनाच्या उपक्रमातून
सी. रमन अन् न्यूटन घडवूया.

श्रीम .मधुबाला नरेंद्र औटे
जि.प. प्राथमिक शाळा लोहारा खुर्द
ता. लोहारा

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!