उमरगा शहरात पार्वती मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. पुणेच्या आठव्या शाखेचा शुभारंभ

उमरगा (जि.धाराशिव ) : उमरगा शहरात पार्वती मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. पुणे च्या आठव्या शाखेचे शनिवारी २२ एप्रिल रोजी उद्घाटन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी ह.भ.प. महेश महाराज माकणीकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक अयूब शेठ कुरेशी,पार्वती मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. पुणेचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब साळुंखे, व्हाईस चेअरमन कल्लेश्वर जाधव, संचालक शरद दिक्षित,दिलील सिंदफळे, लक्ष्मण कोळगे,गोविंद पवार, राजेंद्र जाधव, राष्ट्रवादी कॉग्रेसचे लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंखे, अश्लेश मोरे,संजय पवार,

HTML img Tag Simply Easy Learning

लोहारा शाखेचे मनोज देशपांडे, अभिजित रोडगे, सालेगाव शाखेचे अण्णाराव देशपांडे, श्रीकृष्ण बिराजदार,दाळींब शाखेचे युवराज गायकवाड, महादेव घंटे, कसगी शाखेचे सचिन अलगुडे, बसवराज स्वामी, सास्तुर शाखेचे अरुण माटे, शंकर पवार, उमरगा शाखेचे संदीप दुनगे, परमेश्वर सुरवसे, गोपाळ माने, सचिन देशपांडे,महेश देशपांडे,गणेश चटगे, सचिन निंबाळे यांच्यासह आदी उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळासाहेब सिंदफळे यांनी केले. तर आभार पार्वती मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. पुणेचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब साळुंखे यांनी मानले.

 

याप्रसंगी बोलताना संस्थापक अध्यक्ष आबासाहेब साळुंखे म्हणाले की, कर्ज वाटप ३८ कोटी रुपये कर्ज वाटप आहे. तर बॅकेची कर्ज वसुली ९५ टक्के आहे. व्यवसायीक कर्ज ५ लाख तर वैयक्तिक कर्ज २ लाख रुपये दिले जाते. ठेवीदाराच्या विश्वासास आम्ही पात्र आहोत. आम्हाला सन २०१८ ला सह्याद्री अर्थरत्न पुरस्कार मिळाला. ISO 9000 प्रमाणपत्र मिळाले. बॅकेच्या यशाचे श्रेय आमच्या कर्मचाऱ्यांचे आहे. महीला बचत गटाना कर्ज न देता आम्ही प्रोजेक्ट देऊन महीलांना सक्षम करण्याचा आमचा यापुढे प्रयत्न राहणार आहे. असे सांगितले.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!