विश्वेश्वरय्याचा यशोदिप चव्हाण 91.22 टक्के गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम महाविद्यालयातून 23 विद्यार्थी 90 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण

औसा (प्रतिनिधी) : औसा तालुक्यातील आलमला येथील विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयाचा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने घेतलेल्या हिवाळी परिक्षा 2022 चा निकाल घोषित झाला असून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवत महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी हिवाळी परिक्षेत घवघवीत यश संपादन केले असून 23 विद्यार्थी 90 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले तर 497 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.
महाविद्यालयातील अंतीम वर्षातील संगणक विभागातील यशोदीप चव्हाण याने 91.22 टक्के गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम आला आहे, स्वाती पाटील 90.11 टक्के गुण घेऊन व्दितीय तर पदमा शर्मा 88.78 टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे. स्थापत्य अभियांत्रिकी विभागातून तेजस्विनी लहाने 90.90 टक्के गुण घेऊन प्रथम, रितवर्ता सिंग 90.70 टक्के गुण घेऊन व्दितीय तर ऋतुजा खोजे 89.10 टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे. विभागातून विशाल देवकते 88.88 टक्के, तेजस खानापुरे 88.20 गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. यांत्रिकी विभागातील शिवानंद सुतार 86.95 टक्के गुण घेऊन प्रथम, आदित्य कुमार 84.76 टक्के गुण घेऊन व्दितीय तर सागर माकुडे 84.00 टक्के गुण घेऊन तृतीय आला आहे. अणुविद्युत विभागातून पायल चव्हाण 87.58 टक्के गुण घेऊन प्रथम, ऋतुजा कुलकर्णी 81.58 टक्के गुण घेऊन व्दितीय तर ज्योती कनामे 78.21 टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे. विद्युत विभागातून अर्पिता हिंगमिरे 84.40 टक्के गुण घेऊन प्रथम, चिन्मय देशमाने 83.40 टक्के गुण घेऊन व्दितीय तर अभय काकडे 82.30 टक्के गुण घेऊन तृतीय आला आहे.
व्दितीय वर्ष संगणक विभागातून अल्फिया कारभारी 90.00 टक्के गुण घेऊन प्रथम, हर्ष काळे 88.27 टक्के गुण घेऊन व्दितीय तर प्रथमेश बावगे 87.73 टक्के गुण घेऊन तृतीय आला आहे. विद्युत विभागातुन श्वेता मुंढे 90.50 टक्के गुण घेऊन प्रथम, श्रावणी चिंते 83.13 टक्के गुण घेऊन व्दितीय तर कृष्णा बिराजदार 81.00 टक्के गुण घेऊन तृतीय आला आहे. स्थापत्य विभागातून प्रणिता कदम 88.67 टक्के गुण घेऊन प्रथम, शिवम भोसले 87.56 टक्के गुण घेऊन व्दितीय तर मेहराज मुल्ला 87.11 टक्के गुण घेऊन तृतीय आला आहे. अणुविद्युत विभागातून स्वप्निल कदम 80.00 टक्के गुण घेऊन प्रथम, व्यंकटेश शर्मा 79.53 टक्के गुण घेऊन व्दितीय तर सोमेश भुजबळ 79.18 टक्के गुण घेऊन तृतीय आला आहे. यांत्रिकी विभागातून त्र्यंबकराव पाटील 77.05 टक्के गुण घेऊन प्रथम, अंकित कुमार 70.11 टक्के गुण घेऊन व्दितीय तर अंकित कुमार 65.47 टक्के गुण घेऊन तृतीय आला आहे.
प्रथम वर्ष संगणक विभागातून स्मृती गाढवे 88.71 टक्के गुण घेऊन प्रथम, स्वप्निल मिरकले 88.43 टक्के गुण घेऊन व्दितीय तर प्रेरणा साळुंके 87.57 टकके गुण घेऊन तृतीय आली आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागातून अबोली करमुडे 88.43 टक्के गुण घेऊन प्रथम, राघव देशपांडे 84.86 टक्के गुण घेऊन व्दितीय तर सुमित शिंदे 84.29 टक्के गुण घेऊन तृतीय, शिवम कलमे 84.14 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला आहे. अणुविद्युत प्रथम वर्षातून प्रज्ञा क्षिरसागर 86.86 टक्के गुण घेऊन प्रथम, अभिजित मेटे 85.71 टक्के गुण घेऊन व्दितीय तर ओमकार डफाळ 83.00 टकके गुण घेऊन तृतीय आला आहे. विद्युत विभागातून अण्णासाहेब शिंदे 84.14 टक्के गुण घेऊन प्रथम, वैभवी गायकवाड 83.29 टक्के गुण घेऊन व्दितीय तर रूद्राक्ष दासरे 78.00 टकके गुण घेऊन तृतीय आला आहे. यांत्रिकी विभागातून ओंकार बिरादार 83.86 टक्के गुण घेऊन प्रथम, कौस्तुभ तिघिले 79.86 टक्के गुण घेऊन व्दितीय तर अदिल पठाण 79.00 टकके गुण घेऊन तृतीय आला आहे. स्थापत्य विभागातून अरफात पंचभाई 81.43 टक्के गुण घेऊन प्रथम, प्रतिक मोरे 80.71 टक्के गुण घेऊन व्दितीय तर सुधांशु मसने व वैष्णवी पतंगे अनुक्रमे 78.86 टकके गुण घेऊन तृतीय आले आहेत.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष शिवचरण धाराशिवे, उपाध्यक्ष प्रभाकर कापसे, सचिव बसवेश्वर धाराशिवे, सहसचिव महादेव खिचडे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत धाराशिवे, उपप्राचार्य गोपाळ दंडिमे, विभागप्रमुख प्रा. रेवणसिध्द बुक्का, प्रा. अजित लोकरे, प्रा. मंगेश बिडवे, प्रा. संदेश माडे, प्रा. प्रविण साबदे, प्रा. अंकुश बिडवे, प्रा. अब्दुल समद काझी सर्व प्राध्यापक वंृद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!