श्री गुरु सिद्धेश्वर विरक्त मठामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव


जेवळी : लोहारा तालुक्यातील जेवळी येथील भाविक भक्तांचे.श्रद्धास्थान असलेल्या श्री गुरु सिद्धेश्वर विरक्त मठामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कार्तिकमास दीपोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी हजारो दीप प्रज्वलित केल्याने गुरु सिद्धेश्वर विरक्त मठ लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले होते.
कार्तिक मास निमित्त जेवळी येथील श्री गुरु सिद्धेश्वर विरक्त मठामध्ये कार्तिक दीपोत्सवाचे आयोजन सोमवार ता 7 रोजी करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजता मठात सामूहिक भजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर साडेसहा वाजता मनिप्र गंगाधर महास्वामीजीच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील यांच्या हस्ते विरक्तमठा मधील श्री वीरभद्रेश्वर मंदिरात महामंगल आरती करण्यात आली. यावेळी माजी सभापती सचिन पाटील, विठ्ठल साईचे संचालक दिलीप भालेराव, उमरगा जनता बँकेचे व्यवस्थापक शिवानंद चवले उपस्थित होते.
श्री गुरु सिद्धेश्वर विरक्त मठाचे मठाधीश मनिप्र गुरु गंगाधर महास्वामीजी यांच्या हस्ते नवीन मठामध्ये दीपप्रज्वलन करण्यात आले त्यानंतर उपस्थित भाविक भक्तांनी संपूर्ण नवीन व जुन्या मठात दीप लावले. लक्ष लक्ष दिव्यानी संपूर्ण श्री गुरु सिद्धेश्वर विरक्त मठ उजळून निघाले होते.श्री बसवेश्वर मंदिरात गावातील भक्त लोकमत पेपर एजंट शिवाप्पा कारभारी व कल्याणी कारभारी यांनी मंदिरात दीप प्रजवलन केले.
या सामूहिक दीप सोहळा कार्यक्रमासाठी उपसरपंच मल्लिनाथ डिग्गे, अभियंता राजू माळी, सुभाष चटगे, शिवराम हावळे, शरणप्पा श्रीशैल कारभारी विलास हावळे, संजय तांबडे,सिद्राम भुसाप्पा, सत्तेश्वर कारभारी, गौरीशंकर पनुरे, अप्पू तांबडे, योगिराज सोळसे, रोहित कारभारी, आकाश पाटील, श्रीकांत वलदोडे, बसवराज कारभारी, चैतन्य शिंदे, रोहित खडके,राजू स्वामी, वैभव पवार, यांच्यासह गावातील भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोहारा तालुक्यातील जेवळी येथील श्री गुरु सिद्धेश्वर मठ व बसवेश्वर मंदीरात लक्ष लक्ष दीप प्रज्वलनाने केल्याने संपूर्ण मठ,मंदिर दिव्यांनी उजळले होते.