उमरगा बसस्थानकास मिळाल्या १० नविन बसेस ; युती शासनाची गणेश उत्सवानिमित्त भेट

उमरगा ( जि.धाराशिव ) : उमरगा आगार हे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेले शेवटचे बस स्थानक असल्याने बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. स्थानकातील बसेसची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने व स्थानकात कमी बसेस असल्याने बस स्थानक प्रशासनास ग्रामीण भागातील प्रवासी वाहतूक नियोजन करण्यात अनेक अडचणी येत होत्या. त्या अनुषंगाने आमदार ज्ञानराज चौगुले यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून उमरगा बस स्थानक साठी 10 नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत.
आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आज दि.28/09/2023 रोजी बसस्थानक गणेश मंडळाच्या श्री गणेशाची आरती केली व त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या शुभ मुहूर्ताचे औचित्य साधुन बसेसचे लोकार्पण केले. त्यावेळी उमरगा स्थानक प्रशासनाकडून आमदार ज्ञानराज चौगुले यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सभापती कृ.उ.बा. समिती जितेंद्र शिंदे, युवानेते किरण गायकवाड, तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, आगारप्रमुख अक्कुलवार, माजी नगराध्यक्ष बालाजी सुर्यवंशी, माजी नगसेवक विवेक हराळकर, उपतालुकाप्रमुख शेखर सूर्यवंशी, शहर प्रमुख योगेश तपसाळे, सचिन जाधव, शरद पवार, संदीप चौगुले, अमर शिंदे, सरपंच शेखर घंटे, भाऊ सुरवसे, कुमार गाढवे, विनोद मुसांडे, शफी चौधरी, गोपाळ जाधव, आप्पासाहेब पाटील,विनोद कोराळे, आकाश मोरे, मुर्तूजा मुंगले, शहाजी येळीकर, संजय पवार,निखिल वाघ, संजय राठोड, सुनिल बडे, अरूण जगताप, श्रीकांत पाटिल, पप्पू समन, सय्यद अब्दुल सत्तार, पाशा पटेल, सत्तार जेवळे, परवेज सौदागर, महताब मकान दार, इरफान सौदागर, शरीफ हूच्चे, महेबुब येनेगुरे, बाबा जेवले, मोहसीन मदार, सलीम हुच्चे व बस स्थानक कर्मचारी बी. एम. पाटील, सुनील शेंडगे, बटगीरे एन. जी., बबन बानवलकर, पी. के. पवार, यशवंत पाटील, वाकडे ए. आर., कलशेट्टी एस. बी., व इतर कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.