बाल आनंद मेळाव्यात विविध पदार्थाची मेजवानी ; पालकांकडून मोठा प्रतिसाद


लोहारा ( जि.धाराशिव ) : लोहारा तालुक्यातील मोघा (खुर्द ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात ७ हजार रुपयांची उलाढाल झाली आहे.
या मेळाव्याची सुरूवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन सचिन गोरे, नंदकुमार गरगडे,केंद्रप्रमुख विश्वजित चंदनशिवे, साधनव्यक्ती रविशंकर आगळे,अंगद भोंडवे यांच्या हस्ते करुन झाली.विविध पदार्थाच्या मेजवानीला नागरीक, पालकांकडून मोठा प्रतिसाद दिसून आला. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध पदार्थ्यांचे 20 स्टॉल लावले होते.

यामध्ये पाणीपुरी, गुलाबजामून, अप्पेवडे, धपाटे,भेळ, सरबत,पावभाजी, चिवडा, बासुंदी, इडली सांबर, चहा,मठ्ठा,मंचुरियन,वडापाव,समोसे, उडीदवडा, मिरची भजे, मेदुवडा, उकडलेले अंडे,चुरमुरा,शेंगा लाडू आदी स्टॉल लावण्यात आली होते. त्याचबरोबर किराणा दुकान व हरे एक माल, प्लास्टीक खेळणी दुकान लावण्यात आले होते. विविध पदार्थाच्या मेजवानीला नागरीक, पालकांकडून मोठा प्रतिसाद दिसून आला. तासाभरात सर्व पदार्थाची विक्री होवून पुन्हा विविध पदार्थ बनबाबे लागले.पाणी पुरी, धपाटे, बासुंदी, पावभाजी,अप्पेवडे,इडली सांभर, मठ्ठा या स्टालला मोठा प्रतिसाद दिसून आला. यावेळी नागरीकांनी पदार्थ्यांच्या मेजवानीचा अस्वाद घेत विद्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञानाचे धडे देवून पैसे देताना परीक्षाही घेतली.

यात विद्यार्थ्यांनी अचुक उत्तरे देत मालाचे बरोबर पैसे घेतल्याचे पाहायला मिळाले.किराणा दुकान व प्लास्टिक खेळणी दुकानातुन महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात खरेदी केली.या मेळाव्यात 7000 रूपयाची खरेदी विक्री झाल्याचे शाळेचे मुख्याध्यापक विकास घोडके यांनी सांगितले.बाआनंद मेळाव्यातुन प्रत्यक्ष खरेदी विक्री, नफा तोटा,विविध पदार्थाची ओळख, बनविण्याची क्रिया, विविध आकार, व्यवहारीक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळाले आहे असे सहशिक्षिका बर्डे यु. व्ही यांनी सांगितले.सदरील मेळावा नियोजन चांगल्या प्रकारे नियोजन केल्याने अतिशय सुंदर झाला.चवदार पदार्थाची मेजवानी मिळाली अशी प्रतिक्रिया केंद्रप्रमुख विश्वजित चंदनशिवे,जिवन गायकवाड यांनी दिली.यावेळी शिवराज पाटील,लक्ष्मण भोंडवे,शहाजी दळवे, शिवहारी दळवे,बालाजी बाबळे,विनायक गरगडे, मारूती भोंडवे, बालाजी सोनटक्के,मुस्तफा मुजावर,राजेश भोंडवे,सतीश मत्ते,बब्रुवान भोंडवे,बब्रुवान मत्ते,आनंदा हिरवे,विश्वनाथ मत्ते, विश्वनाथ पाटील, महादेव पाटील,प्रभाकर भोंडवे,दादा पवार,हणमंत भोंडवे,कृष्णाथ भोंडवे,वंदना गरगडे, सुरेखा भोंडवे,सविता दळवे, सुनिता मत्ते,सुनिता गोरे,वैशाली गरगडे, बालीका भोंडवे, संजिवनी भोंडवे, रेखा दळवे, जनाबाई बोंडगे,समिना मुजावर, संजिवनी भोंडवे,काशिबाई भोंडवे,कालींदा मत्ते यांच्यासह महिला,युवक वर्ग, युवकमित्र,पालक,विद्यार्थी, नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.मेळाव्याच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक विकास घोडके,उषा बर्डे,हमीद मुजावर,रईसा मुजावर,पालकवर्ग, विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!