लोहारा/उमरगा : लोहारा तालुक्यातील वडगांव गांजा ते वडगांववाडी नवीन वीज पुरवठ्याची मेन लाईन टाकण्याचे काम चालू आहे. काम करत असताना सामाजिक वनीकरण अंतर्गत लावलेल्या दुतर्फा वृक्षांची तोड करण्यात आली आहे. वडगांव वाडी बस स्टँड जवळील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांची कत्तल झाली आहे. तरी संबंधित विभागाने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी निकेश बचाटे, महादेव गिराम यांनी केली आहे.