राज्यातील ऊसतोड कामगारांची नोंदणी करून ओळख पत्र देण्यासाठी खाजगी एजन्सीची नियुक्ती करा

धाराशिव : महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांची नोंदणी करून ओळख पत्र देण्यासाठी खाजगी एजन्सीची नियुक्ती करून ऊसतोड कामगारांना कल्याणकारी योजना आणि त्यांच्या पाल्याना शालेय सुविधा इत्यादी मागणीसाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यासोबत त्वरित बैठक लावण्यासादर्भात आज दिनांक 05/09/2023 रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरेश पवार, श्री. संदीप झा. पवार उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, दिनेश राठोड जिल्हा कार्याध्यक्ष उस्मानाबाद यांच्या वतीने सन्मानीय शिंदे साहेब मुख्यमंत्री, सन्माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री,मा. डॉ. श्रीकांत तोडकर विशेष कार्यकारी अधिकारी, मा. दळवी साहेब मुख्यमंत्री उपसचिव, मा.भांगे साहेब प्रधान सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मुंबई यांना निवेदन देऊन एजन्सी मार्फत त्वरित नोंदणी करण्याबाबत विनंती केल्यानुसार मा. सुमंत भांगे सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी पुणे आयुक्त समाजकल्याण तथा मॅनेजिंग डायरेक्टर गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळ पुणे यांना त्वरित एजन्सीचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.
तसेच मुख्यमंत्री साहेबांचे स्वीय साहाय्यक मा. डॉ. श्रीकांत तोडकर(विशेष कार्यकारी अधिकारी )साहेब, यांनी यांनी संबंधित विभागाची संघटनेसोबत ऊसतोड कामगारांचे त्वरित प्रश्न मार्गी लावण्या संधर्भात बैठकीचे प्रस्ताव मा. दळवी साहेब मुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव यांचे काडून मा. भांगे साहेब यांना आदेश देऊन बैठक लावण्याची पूर्व कल्पना दिल्याने संघटनेमार्फत मुख्यमंत्री कार्यालयायचे आभार मानले.
महाराष्ट्रातील ऊसतोड करगारांची कांही दिवसात खाजगी एजन्सी मार्फत नोंदणी होणार. नोंदणी झाल्यास ऊसतोड कामगार त्यांचे मुले यांनी शासकीय योजना मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटने मार्फत शासन स्तरावर केलेल्या 22 मागणीची पर्तता येत्या काळात पूर्ण होणार असल्याले संघानेचे पदाधिकारी आनंद व्यक्त केले.
तरी ऊसतोड बांधवानी दलाल, एजंट फसव्या लोकांच्या फसवणूकीपासून सावध रहावे कोणी आर्थिक फसवणूक करून दिशाभूल करीत असतील तर त्वरित त्यांचेवर गुन्हा दाखल करावा किंवा आमच्या संघटभेच्या पदाधिकाऱ्यां संपर्क करावे हि विनंती.
सुरेश ह. पवार
संस्थापक अध्यक्ष
तुळजाभवानी ऊसतोड का. सं.
महाराष्ट्र राज्य
मो.8007503513