स्वच्छतागृह बांधकामासाठी पंचायत समितीकडून मुदतवाढ मिळाल्याने आमरण उपोषण मागे

जेवळी ( ता.लोहारा ) :- लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी येथे स्वच्छ भारत मिशन अतंर्गत महादेव मंदिरात मंजूर असलेले सार्वजनिक स्वच्छतागृह बांधकामासाठी पंचायत समिती कडून मुदतवाढ मिळाल्याने मंगळवारी सायंकाळी आमरण उपोषण मागे घेण्यात आले.
स्वच्छ भारत मिशन या योजनेतून येथे मंदिराच्या आवारात मंजूर सार्वजनिक स्वच्छतागृह मंजूर करण्यात आले होते. पण नेमके कोणत्या ठिकाणी स्वच्छता गृहाचे बांधकाम करावयाचे यावरून दोन गटात वाद निर्माण झाला होता. स्वच्छता गृह बांधकामाची मुदत दोन आँक्टोबर रोजी संपली होती त्यामुळे येथील दोन युवकांनी यासंदर्भात दक्षिण जेवळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोमवार पासून आमरण उपोषण करण्यासाठी बसले होते.
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी एस.आर.खिंडे यांनी या मुदत संपलेल्या स्वच्छता गृहाच्या बांधकामाची मुदत वाढवून दिली आहे त्यामुळे ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत साखरे ग्रामविकास अधिकारी एम.के. बनशेट्टी यांनीही ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता गृहाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पत्र दिल्याने मंगळवारी सायंकाळी येथील उपोषणकर्ते नागेश होनाजे शेतकरी राजेंद्र होनाजे यांनी आपले उपोषण मागे घेतले.
यावेळी सरपंच चंद्रकांत साखरे, ग्रामविकास अधिकारी एम.के. बनशेट्टी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवराज चिनगुंडे, सतिश उपासे,अप्पू सुरवसे,सत्तेश्वर मुखे उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!