केंद्राच्या परिपत्रकाने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान – जगताप

धाराशिव : चालू खरीप हंगामात देखील 30 एप्रिल 2024 च्या केंद्राच्या परिपत्रकाने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होत असल्याने तातडीने रद्द करा अन्यथा 26 सप्टेंबर पासून जिल्ह्यात रस्ता रोको आंदोलन करणार सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांचा प्रशासनाला प्रसिद्धी पत्रकाद्वारे इशारा.
चालू खरीप हंगामात देखील केंद्र शासनाच्या 30 एप्रिल 2024 च्या जुलमी परिपत्र पत्रकामुळे शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई चे वाटप होणार असल्याने शेतकऱ्याच्या पदरात प्रति हेक्टरतपाच ते सहा हजार रुपये पदरात पडतील त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याचे खरीप 23 व 24 हंगामातील दीड हजार कोटी रुपये चे नुकसान होत असल्याने ते तातडीने रद्द करावे अन्यथा जिल्हाभर 26 सप्टेंबर पासून रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

 

यावर्षी धाराशिव जिल्ह्यातील सात लाख 19 हजार 853 शेतकऱ्यांनी पिक विमा भरला असून पिक विमा कंपनीला 610 कोटी रुपये रक्कम देणे आहे जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात पाऊस झाली शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पूर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या तीन लाख दहा हजार 813 इतके असून त्याला अनुसरून जिल्हा कृषी प्रशासनाने सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना 22 सप्टेंबर रोजी पत्र देऊन स्पष्टपणे सांगितले आहे की बाधित क्षेत्र हे अधिसूचित महसूल मंडळातील एकूण विमा उतरवलेल्या क्षेत्राच्या 25 टक्के पेक्षा जास्त असल्यास स्थानिक आपत्ती अंतर्गत प्राप्त झालेल्या पूर्व सूचनाच्या नुकसानीचे स्वरूप व्यापक मानले जाईल सदर प्रकरणी स्थानिक आपत्ती अंतर्गत प्राप्त झालेल्या पूर्व सूचनाच्या विमा भरपाईची परी गणना ही घटक गृहीत धरून परंतु ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीची पूर्व सूचना विहित मुदतीत दिलेली आहे व ते विमा कंपनीने स्वीकारलेली आहे अशा शेतकऱ्यांनाच नमुना सर्वेक्षणानुसार येणाऱ्या सरासरी नुकसानीच्या टक्केवारीनुसार विमा भरपाई देय होणार आहे सदरील जोखीम अंतर्गत विमा भरपाईची परि गणना पुढील सूत्रानुसार होणार आहे.

स्थानिक आपत्ती अंतर्गत ध्येय विमा भरपाई रक्कम=(सरासरी बाधित क्षेत्र टक्केवारी x सरासरी पिकाचे नुकसान टक्केवारी ) x विमा संरक्षित रक्कम x 25% याप्रमाणे देण्यात येणार आहे.

पूर्वसूचनाचे सर्वेक्षण पुढील प्रमाणे करण्यात येणार आहे. …

एकूण क्षेत्राच्या 25% पर्यंत पूर्व सूचना आल्या तर सर्व पूर्व सूचनाचे पंचनामे केले जातील तर एकूण विमा महसूल मंडळाच्या 25 ते 50 टक्के पूर्व सूचना आल्या तर आलेल्या पूर्व सूचना पैकी केवळ 25% पूर्व सूचनाचे सर्वेक्षण केले जाईल तसेच एकूण महसूल मंडळाच्या 50% ते 100% पर्यंत पूर्वसूचना आल्यास एकूण पुरुष सूचनाच्या 30 टक्के सर्वेक्षण करून 30 एप्रिल 2024 च्या परिपत्रकाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येईल.
नुकसान भरपाई देण्याची ही पद्धत शेतकऱ्यांना आर्थिक हनी पोहोचवणारी आहे त्यामुळे केंद्र शासनाचे परिपत्रक रद्द होणे अत्यंत महत्त्वाचे आहे

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पद्धतीने पिक विमा मिळाला तर केवळ पाच ते सहा हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे पीक विमा मिळेल जो शेतकऱ्यावर प्रचंड अन्याय करणारा आहे म्हणून हे परिपत्रक रद्द होणे गरजेचे आहे.जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवांनी फोन करून मी पूर्व सूचना दिली आहे मात्र पंचनामे करण्यासाठी कोणीच आले नाही असे सांगितले आहे त्या सर्वांना ही सत्य परिस्थिती लक्षात यावी म्हणून हे प्रसिद्ध पत्रक काढले आहे सर्वच शेतकऱ्याच्या पंचनामाचे सर्वेक्षण होणार नसून ठराविक पूर्वसूचनाचे रँडम पद्धतीने सर्वेक्षण करून पीक नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

 

➡ केंद्र शासनाच्या 30 एप्रिल 2024 च्या परिपत्रकाप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिक विमा नुकसान भरपाई संदर्भात प्रचंड आर्थिक हानी होत आहे परिपत्रक रद्द व्हावे यासाठी धाराशिव ,तुळजापूर ,उमरगा ,धरणे आंदोलन केलेले आहेत तसेच या संदर्भात 23 एप्रिल रोजी शेवटचे धरणे आंदोलन लोहारा तहसील कार्यालयासमोर करणार असून त्यानंतर 26 सप्टेंबर पासून जिल्ह्यात रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल तातडीने 30 एप्रिल 2024 ची परिपत्रक रद्द करण्यात यावे. नुकसान भरपाई देऊन नंतर उशिराने परिपत्रक रद्द केल्यास धाराशिव जिल्ह्यातील खरीप 23 व खरीप 24 हंगामातील मिळून साधारणपणे दीड हजार कोटी रुपयांची नुकसान होईल म्हणून तातडीने परिपत्रक रद्द करावे व नंतरच पिक विमा नुकसान भरपाई देण्यात यावी.
अनिल जगताप, पिक विमा, याचिकाकर्ते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!