मार्डी येथील जिंदावली यांच्या उरुसानिमित्त खा.ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते दर्ग्यास फुलांची चादर अर्पण

लोहारा : लोहारा तालुक्यातील मार्डी येथील हजरत खाजा जैनोद्दिन चिस्ती (जिंदावली) दर्गा यांच्या उरुसानिमित्त खा.ओमराजे निंबाळकर यांनी भेट दिली. शनिवार पासुन या उत्सवास प्रारंभ झाला आहे.लोहारा शहरातुन या ठिकानी मानाच्या दोन संदल प्रत्येक वर्षी काढल्या जातात.यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात.हिंदु मुस्लीम ऐकतेचे प्रतीक जिंदावली दर्गास मानले जाते.हैद्राबादसह लोहारा तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होतात.
खा.ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते याठिकानी फुलांची चादर चढवण्यात आली.यावेळी हैद्राबादचे मुर्शद सय्यद अजमत उल्ला हुसैनी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी जि.प.सदस्य दिपक जवळगे,युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार,मार्डीचे आण्णासाहेब पाटिल,माजी सरपंच मार्डी आप्पासाहेब देवकर,माजी उपसरपंच कानेगाव नितिन पाटिल,हारुन खानापुरे, जब्बार मुल्ला,रेबे चिंचोलीचे उपसरपंच पवन मोरे,प्रेम लांडगे,जावेद जेवळे यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.