कृषीधाराशिव

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आमदार प्रवीण स्वामी यांच्या पाठपुराव्याला यश; पीक विमा, फार्मर आयडी व कर्जमाफीवर ४ ऑगस्टला निर्णायक बैठक

 

HTML img Tag Simply Easy Learning

लोहारा | प्रतिनिधी

धाराशिव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड घडली आहे. खरीप २०२५ पीक विमा, लोहारा तालुक्यातील फार्मर आयडी व लँड सीडिंगमधील तांत्रिक अडचणी तसेच शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नांवर आमदार प्रवीण स्वामी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला राज्याचे कृषिमंत्री नामदार दत्तामामा भरणे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.


आमदार स्वामी यांनी या महत्त्वाच्या प्रश्नांवर तातडीने उच्चस्तरीय बैठक घेण्याची मागणी कृषिमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार मंगळवार, दि. ४ ऑगस्ट रोजी दुपारी कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्या दालनात संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत खरीप २०२५ पीक विम्यातून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न, फार्मर आयडी व लँड सीडिंगमधील तांत्रिक त्रुटी, तसेच कर्जमाफीसंदर्भातील प्रलंबित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार असून, यावर ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

धाराशिव जिल्ह्यासह लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर सकारात्मक मार्ग निघण्याची आशा व्यक्त होत आहे. त्यामुळे आता ४ ऑगस्टच्या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!