गुरू अबॅकस परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

लोहारा : लोहारा शहरातील गुरू अबॅकस अँड वेदिक मॅथ क्लासेस मधील विद्यार्थ्यांची पुणे व अमरावती येथे (दि.२५) जुन मध्ये संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय अबॅकस अँड वेदिक मॅथ परीक्षेत २२ पैकी १५ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून या गुणवंत विद्यार्थ्यांचा लोहारा येथे रविवारी (दि.२०) मान्यवरांच्या हस्ते गोल्ड मेडल प्रमाणपत्र व चषक देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगगुरू तथा सहशिक्षक बालाजी मक्तेदार हे होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक रवी पवार, बालरोगतज्ज्ञ डॉ. आम्लेश्वर गारठे, नगरसेविका संगीता पाटील, सेवानिवृत्त आरोग्य सहाय्यक शिवहर बिराजदार, जेष्ठ पत्रकार निळकंठ कांबळे, सेवानिवृत्त शिक्षक के. जी. बायस, सेवानिवृत्त गटसचिव सिद्राम माळी, प्रा. अमृता दिक्षित-बायस, यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्री. मक्तेदार व इतर मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन व आभार प्रा. जे. के. बायस यांनी केले. यावेळी श्री. जाधव, पालक दिनेश गाडीलोहार, राजश्री फावडे, लक्ष्मी वाले, योगिता वचने, परवीन बागवान, सुकन्या जट्टे, यांच्यासह आदी उपस्थित होते.

या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

लोहारा शहरातील गुरू अबॅकस अँड वेदिक मॅथ क्लासेस मधील विद्यार्थी आराध्या जट्टे, समर्थ पोतदार, आरोही गायकवाड, जिज्ञा पाटील, शांभवी माशाळकर, समर्थ वाले, आयान बागवान, रेहान बागवान, जिशान शेख, सायली फावडे, श्रद्धा पाटील, अस्मिता गिराम, शरयू पाटील, श्रावणी भुजबळ, अजिंक्य लोहार यासह आदी विद्यार्थ्यांनी अबॅकस अँड वेदिक मॅथ परीक्षेत यश मिळवल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गोल्ड मेडल, चषक, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!