राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त लोहारा तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान

लोहारा : लोहारा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन शनिवारी (दि.१०) उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त लोहारा येथील कार्यालयासमोर स्वातंत्र्य सैनिक प्रयागबाई कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, ज्येष्ठ नेते नागन्ना वकील, सामाजिक न्याय विभागाचे जालिंदर कोकणे, शहराध्यक्ष आयुब शेख, प्रकाश भगत, नरदेव कदम, शब्बीर गवंडी, लक्ष्मण रसाळ, मिलिंद नागवंशी, स्वप्निल माटे, मुरलीधर पाटील, सचिन रणखांब, अश्फाक शेख, लक्ष्मण बिराजदार, वामन भोरे, व्यंकट राजपूत आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान त्यांच्या गावी जाऊन करण्यात आला. यावेळी शरद पवार यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण, कृषी, सहकार, आरोग्य, जलसंधारण, औद्योगिक प्रकल्प आणि महिला सक्षमीकरण हा विकासाचा पॅटर्न राबवून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवणारी, तसेच पुरोगामी विचारांचा वसा अखंडपणे तेवत ठेवणारी ही २४ वर्षे आहेत अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!