निवृत्ती वेतन योजनांचा गरजूंना लाभ मिळावा दीपक भाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटनेची मागणी

लोहारा : संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृदधापकाळ निवृत्तीवेतन योजना,श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनांचा गरजूंना पारदर्शक लाभ मिळावा अशी मागणी तहसिलदाराकडे निवेदनाव्दारे दीपक भाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे. की, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनांमध्ये खाजगी एजंट आणि काही अधिकाऱ्यांमुळे प्राप्त असणाऱ्या अर्जदारांचे नुकसान होत आहे. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे प्रकरण या योजनांचे लवकर निकाली निघत नाहीत. यामुळे या योजनेत व नियमात बसणाऱ्या लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक व पिळवणूक होत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning


तरी अशा अनेक लोकांची अर्ज धूळ खात पडली आहेत. या योजनांसाठी अर्ज करून वारंवार पाठपुरावा करून देखील कुठलीच दाद मिळत नाही. यात शासनातील जो कोणी कर्तव्यात कसूर करत असेल तर त्याच्यावर ठोस कार्यवाही करण्यात यावी. आणि संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनांचा शासकीय नियमातील लाभ द्यावा.
अन्यथा दीपक भाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना लोहारा तालुक्यातील प्रत्येक गावातील वयोवृद्ध, अपंग माता भगिनी बांधव , विधवा माता भगिनी यांना घेऊन तहसील कार्यालयसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

असा इशारा दीपक भाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटनेने दिला आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष अमित सुरवसे,उपाध्यक्ष विकी शिंदे,उपाध्यक्ष गंगाधर ओवांडे, सचिव सुरज सुर्यवंशी, सरचिटणीस प्रथमेश कांबळे,संघटक एकनाथ कांबळे,शहराध्यक्ष रोहीत शिंदे, संदीप पाटील, वैभव पाटील,अक्षय भंडारे, मंगेश भंडारे, राजेश मोरे, रोशन कांबळे आदींच्या सह्या आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!